माजी आमदार, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या निर्मलाताई ठोकळ यांचे वृद्धापकाळाने निधन

माजी आमदार, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या निर्मलाताई ठोकळ यांचे वृद्धापकाळाने निधन

महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या व माजी आमदार निर्मलाताई ठोकळ (वय ८५) यांचे मंगळवारी सकाळी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्या वृद्धापकाळाने आजारी होत्या. खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना सकाळी नऊ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे पार्थिव सकाळी अकराच्या सुमारास मुरारजी पेठेतील तोरणा बंगला येथे आणण्यात येणार असून, आज सायंकाळी पाच वाजता पुणे रोड, बाळे स्मशानभूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

निर्मलाताई यांनी काँग्रेस पक्षाकडून राजकारणात कायम सक्रिय भूमिका बजावली होती. त्या सोलापूर शहरातून आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. स्थानिक राजकारणापासून ते राज्याच्या पातळीवरील राजकारणापर्यंत त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला होता. स्थानिक प्रश्नांवर त्यांची पकड ही जबरदस्त होती.

राजकारणासह त्यांचे शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान होते. महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा म्हणून हजारो विद्यार्थ्यांना शिक्षणाची दारे खुली करुन त्यांनी दिली होती. त्यांच्या अमूल्य मार्गदर्शनाखाली संस्थेने अनेक मान्यवर गुणी विद्यार्थी घडवले.

त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुले, सुना व नातवंडांचा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे काँग्रेस परिवारासह शैक्षणिक क्षेत्रातही शोककळा पसरली आहे. स्वातंत्र्यसैनिक स्वर्गीय तुळशीदास जाधव यांच्या त्या कन्या होत्या.

सोलापुरात आयोजित केलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या संयोजनामध्ये त्यांचा सहभाग होता. या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी त्या स्वर्गीय मारुती चित्तमपल्ली यांच्या समावेत मातोश्री येथे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली होती. राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात मोठा सहभाग होता माजी मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले यांच्या त्या नातेवाईक होत्या.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘पीछे देखो पीछे’ मीम फेम अहमद शाहच्या भावाचा कार्डिॲक अरेस्टने मृत्यू; लहान वयातील मुलांमध्ये का वाढतोय धोका? ‘पीछे देखो पीछे’ मीम फेम अहमद शाहच्या भावाचा कार्डिॲक अरेस्टने मृत्यू; लहान वयातील मुलांमध्ये का वाढतोय धोका?
सोशल मीडियावर ‘पीछे देखो पीछे’ या मीममुळे लोकप्रिय झालेला बालकलाकार अहमद शाहला तुम्ही ओळखतच असाल. त्याचा छोटा भाऊ उमर शाहच्या...
Rain Update: जोरदार पावसामुळे जालना जलमय; अनेकांच्या घरात पाणी शिरले, विजेचा कडकडाटाने घबराट
निस्तेज केसांसाठी ही पावडर आहे सर्वात बेस्ट, वाचा
अहिल्यानगर-बीड-परळी वैजनाथ रेल्वे प्रकल्पासाठी अतिरिक्त 150 कोटी रुपयांची मंजूरी, अर्थमंत्री अजित पवार यांचा निर्णय
युवराज सिंग आणि रॉबिन उथप्पा यांच्या अडचणी वाढल्या, ईडीने नोटीस पाठवून चौकशीसाठी बोलावले
राज्यात ई-बाईक टॅक्सीचे लवकरच सुरू होणार, बेसिक भाडेही ठरले
लवंग घालून चहा पिण्याचे फायदे जाणून थक्क व्हाल, वाचा