फक्त भेंडी आणि कारल्याची भाजी नाही तर ‘या’ भाज्याही मधुमेही रुग्णांसाठी आहेत खूप फायदेशीर

फक्त भेंडी आणि कारल्याची भाजी नाही तर ‘या’ भाज्याही मधुमेही रुग्णांसाठी आहेत खूप फायदेशीर

मधुमेही रुग्णांनी आपल्या आहाराकडे लक्ष देणं हे फार महत्त्वाचं आणि गरजेचं मानलं जातं. मधुमेही म्हटल्यावर फक्त कारलं खायचं असं अजिबात नाही. मधुमेही रुग्णांनी आहारामध्ये विविध भाज्यांचा समावेश करणं हे खूप गरजेचं आहे. मुख्य म्हणजे योग्य आहार घेतल्यास, मधुमेह हा कंट्रोल करता येऊ शकतो. योग्य आहार आणि मधुमेहावर मात करण्यासाठी लागणाऱ्या भाज्यांचा समावेश आहारात करणे हे खूप गरजेचे आहे.

तोंडली या भाजीला हिंदीमध्ये कुंदुरू असे म्हटले जाते. ही हिरवी भाजी शरीरात इन्सुलिनसारखे काम करते. अनेक संशोधनात असे आढळून आले आहे की, कुंदुरुमध्ये आढळणारे पोषक तत्व यकृतातून ग्लुकोजचे उत्पादन कमी करतात. म्हणूनच मधुमेही रुग्णांसाठी ही भाजी वरदानापेक्षा कमी नाही.

 

परवल ही मधुमेहाच्या रुग्णांसाठी देखील एक फायदेशीर भाजी आहे. परवलची भाजी केवळ साखरच नाही तर कोलेस्ट्रॉल देखील कमी करण्यास मदत करते. अनेक अभ्यासात असेही म्हटले आहे की परवल मेटफॉर्मिनसारखे काम करते.

 

क्लस्टर बीन्स म्हणजेच गवार. गवार ही भाजी तशी दुर्लक्षित मानली जाते. परंतु या भाजीची चव आणि फायदे आश्चर्यकारक आहेत. गवारीमध्ये भरपूर फायबर असते. यामुळे आतडे निरोगी राहण्यास मदत होते. तसेच ही भाजी खाल्ल्याने साखर वाढत नाही.

Health Tips – सूर्यफुलाच्या बिया खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे, वाचा

शेवग्याच्या शेंगा या मधुमेहींसाठी रामबाण मानल्या जातात. मधुमेहाच्या रुग्णांसाठी ही भाजी फायदेशीर मानली जाते. शेवग्याच्या शेंगा या भाजी बनवून, सूपमध्ये घालून किंवा सांबारमध्ये घालून त्यांचा वापर करू शकता.

स्नेक गार्ड म्हणजेच पडवळ ही लांबट आकाराची भाजी आहे. मधुमेहाच्या रुग्णांसाठी ही भाजी फायदेशीर मानली जाते. मुख्य म्हणजे ही भाजी आपले वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. तसेच पचन सुधारण्यासोबत मधुमेह आणि हृदयरोग नियंत्रित करण्यास उपयोगी मानली जाते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Mumbai News – क्षुल्लक वादातून बारबाहेरच टोळक्याकडून तरुणाची हत्या, मालाडमध्ये खळबळ Mumbai News – क्षुल्लक वादातून बारबाहेरच टोळक्याकडून तरुणाची हत्या, मालाडमध्ये खळबळ
हॉटेल व्यावसायिकाशी झालेल्या क्षुल्लक कारणातून सहा जणांच्या टोळक्याने एका तरुणाची हत्या केल्याची घटना मालाडमध्ये घडली. कल्पेश भानुशाली असे हत्या झालेल्या...
अमेरिकेतही क्रांतीची ठिणगी! डोनाल्ड ट्रम्प यांचा राइट हँड चार्ली किर्क यांची गोळ्या घालून हत्या
तरुणीने विनवण्या करुनही प्रियकर ऐकला नाही, धावत्या ट्रेनमधील तरुणाचे कृत्य व्हायरल
Sindhudurg Crime News – निर्दयी मुलाचा जन्मदात्या आईवर कोयत्याने हल्ला; मातेचा जागीच मृत्यू, कणकवली तालुका हादरला
हुकूमशाहीच्या सर्व मर्यादा ओलांडल्या! संजय सिंह यांच्या नजरकैदेवरून संजय राऊत यांचा भाजपवर निशाणा
Video – ‘आप’चे खासदार संजय सिंह नजरकैदेत, राजकीय वर्तुळात खळबळ
Video- सोलापुरात ढगफुटी सदृश्य पावसामुळे हाहाकार