देशभरात दहा वर्षांत ईडीच्या साडेचार हजार धाडी; फक्त विरोधी पक्षांवर कारवाई, भाजप नेत्यांना रान मोकळे

देशभरात दहा वर्षांत ईडीच्या साडेचार हजार धाडी; फक्त विरोधी पक्षांवर कारवाई, भाजप नेत्यांना रान मोकळे

सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीचा वापर केवळ विरोधी पक्षांतील नेत्यांना गप्प करण्यासाठी आणि त्यांच्यावर सूड उगवण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारकडून केला जात आहे. मे 2014 पासून देशात भ्रष्टाचार, हवाला आणि मनी लॉण्डरिंगच्या नावाखाली ईडीने गेल्या दहा वर्षांत देशभरात 4 हजार 500 हून अधिक ठिकाणी धाडी टाकल्या आहेत, परंतु या धाडीत 95 टक्क्यांहून अधिक लोक हे विरोधी पक्षांतील आहेत. यामध्ये काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, झारखंड मुक्ती मोर्चा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, आम आदमी पार्टी यांचा समावेश आहे. हे सर्व पक्ष विरोधी पक्ष असून भाजपच्या नेत्यांवर मात्र ईडीच्या धाडी पडल्या नाहीत, असे ईडीच्या एकूण कारवाईवरून स्पष्ट दिसत आहे. ईडीने दहा वर्षांत ज्या धाडी टाकल्या आहेत त्यातून 9 हजार 500 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे. ईडीच्या कारवाया केवळ विरोधी पक्षांतील नेत्यांवर केल्या जात आहेत. ईडीच्या कारवाईविरोधात सर्वोच्च न्यायालयानेही कडक ताशेरे ओढले आहेत. तरीही ईडीच्या कारवाया या केवळ विरोधी पक्षांतील नेत्यांविरुद्ध केल्या जात आहेत. विरोधी पक्षांतील नेत्यांशिवाय, वरिष्ठ आयएएस अधिकारी यांच्याविरोधातही ईडीने कारवाया केल्या आहेत.

2019 मध्ये ईडीला नवा अधिकार

एनडीए सरकारने 2019 मध्ये आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायदा (पीएमएलए) मध्ये मोठा बदल केला. या नव्या कायद्यामुळे ईडीला जास्त ताकद मिळाली. आता ईडी स्वतः गुन्हा दाखल करू शकते. तसेच आरोपींना अटकही करू शकते. याआधी ईडीला एजन्सीकडून चार्जशीट केल्याची वाट पाहावी लागत होती. विरोधी पक्षांतील नेत्यांना त्रास देण्यासाठी आणि भाजपमध्ये पक्षप्रवेश करून घेण्यासाठी सत्ताधारी भाजपकडून ईडीचा वापर करण्यात येत आहे, असा विरोधकांचा आरोप आहे.

यूपीएच्या काळात 200 धाडी

केंद्रात डॉ. मनमोहन सिंग यांचे सरकार होते त्यावेळी 2004 ते 2014 या काळात ईडीकडून केवळ 200 ते 250 वेळा धाडी टाकण्यात आल्या होत्या. या धाडीत एकूण 800 ते 900 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली होती, परंतु केंद्रातील सत्तेत मोदी आल्यापासून ईडीच्या धाडी प्रचंड वाढल्या असून या धाडी केवळ विरोधी पक्षांतील नेत्यांवर पडत आहेत. भाजपमधील भ्रष्ट नेत्यांवर ईडीची कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. भाजप नेत्यांच्या विरोधात पुरावा देऊनही ईडीकडून कारवाई केली जात नाही, असा आरोप विरोधी पक्षातील नेत्यांचा आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मूत्रपिंडाच्या समस्या दूर करण्यासाठी स्वयंपाकघारातील ‘हा’ पदार्थ ठरेल फायदेशीर, जाणून घ्या मूत्रपिंडाच्या समस्या दूर करण्यासाठी स्वयंपाकघारातील ‘हा’ पदार्थ ठरेल फायदेशीर, जाणून घ्या
मूत्रपिंड हा आपल्या शरीराचा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे, जो रक्त फिल्टर करण्याचे आणि शरीरातील विषारी घटक काढून टाकण्याचे काम...
अटल सेतूवर कारला भीषण अपघात; डंपरच्या धडकेत अक्षरशः चुराडा, तरुण जागीच ठार
T20 World Cup 2026 ची तोडफोड फटकेबाजी ‘या’ तारखेपासून सुरू होणार! फायनलचं ठिकाण अजूनही गुलदस्त्यात
Hingoli News – डोंगरकडा शिवारात भरधाव बसची दुचाकीला धडक, दुचाकीस्वार जागीच ठार
Nanded News – जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रयत्नामुळे चार आठवडे बंद असलेली विमानसेवा सुरू होणार, प्रवशांना दिलासा
बिबट्याच्या हल्ल्यात 3 वर्षीय बालकाचा मृत्यू, आईच्या डोळ्यासमोरच चिमुकल्यावर झडप
Vice President Election Results – सीपी राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपतीपदी निवड