मुंबईकर प्रणीत मोरे बिग बॉसच्या घरात
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध शो बिग बॉस-19 व्या सीझनला सुरुवात झाली आहे. यंदाच्या सीझनमध्ये एकूण 16 स्पर्धकांनी बिग बॉसच्या घरात प्रवेश घेतला आहे. यात महाराष्ट्रातील प्रसिद्ध स्टॅण्डअप कॉमेडियन, रेडिओ जॉकी आणि कंटेट क्रिएटर प्रणीत मोरेचा समावेश आहे. बिग बॉसच्या घरात आता पॉलिटिकल थीम आहे. बिग बॉस-19 मध्ये एक खास बदल पाहायला मिळणार आहे. बिग बॉसचे शो आधी ओटीटीवर पाहायला मिळणार आहे, तर त्यानंतर टीव्हीवर शो पाहायला मिळणार आहे.
बिग बॉसचा हा सीझन एकूण चार महिन्यांपर्यंत चालणार आहे. यामध्ये प्रेक्षकांना रणनीती, राजकारण, भावनिक गोष्टी आणि मनोरंजनाचे संपूर्ण पॅकेज पाहायला मिळतील. या सीझनमध्ये एकूण 16 स्पर्धक असून यात अशनूर कौर, जीशान कादरी, तान्या मित्तल, आवेज दरबार, नगमा मिराजकर, नेहल चुडासमा, बशीर अली, अभिषेक बजाज, गौरव खन्ना, नतालिया जानोसजेक, फरहाना भट्ट, प्रणित मोरे, नीलम गिरी, कुनिदा सदानंद, मृदुल तिवारी आणि अमाल मलिक यांचा समावेश आहे.
कोण आहे प्रणीत मोरे?
प्रणीत मोरे हा स्टॅण्डअप कॉमेडियन म्हणून प्रसिद्ध आहे. मुंबईत जन्मलेला प्रणीत मोरे हा मूळचा रत्नागिरी जिह्यातील आहे. वडील एसटी कंडक्टर तर आई गृहिणी म्हणून काम करतात.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List