ठाकरे गटाच्या उमेदवारावर काँग्रेस नेत्याचा आक्षेप, नेमकं कारण काय?

ठाकरे गटाच्या उमेदवारावर काँग्रेस नेत्याचा आक्षेप, नेमकं कारण काय?

ठाकरे गटाकडून आज उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत एकूण 16 उमेदवारांची नावे आहेत. तर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्विटरवर खासदार अरविंद सावंत यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे आतापर्यंत ठाकरे गटाकडून 17 जागांचे उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे ठाकरे गटाकडून उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर लगेच महाविकास आघाडीत मतभेद समोर येताना दिसत आहेत. ठाकरे गटाने जाहीर केलेल्या सांगली आणि उत्तर पश्चिम मुंबई या दोन जागांवर काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. उत्तर पश्चिम मुंबई या जागेसाठी ठाकरे गटाकडून जाहीर झालेल्या उमेदवारावर काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केलीय.

सांगलीची जागा ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील यांना जाहीर करण्यात आली आहे. पण या जागेवर काँग्रेसचा दावा आहे. तसा हा मतदारसंघ काँग्रेसला बालेकिल्ला राहिला आहे. त्यामुळे ही जागा आपल्यालाच मिळावी, असा काँग्रेसचा दावा आहे. विशेष म्हणजे सांगलीच्या जागेसाठी काँग्रेस आमदार विश्वजीत कदम पक्षश्रेष्ठींच्या भेटीसाठी दिल्लीत गेले आहेत. त्यांनी पक्षश्रेष्ठींची भेट घेत आपलं म्हणणं मांडलं देखील आहे. तर दुसरीकडे उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघाच्या उमेदवाराविरोधात काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी उघडपणे भूमिका मांडली आहे.

संजय निरुपम यांचा अमोल कीर्तिकर यांना विरोध का?

ठाकरे गटाकडून उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. पण अमोल कीर्तिकर यांच्या उमेदवारीला संजय निरोपम यांनी उघडपणे विरोध केला आहे. उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघ हा परंपरेने काँग्रेस पक्षाचा मतदारसंघ असल्याचा दावा संजय निरुपम यांनी केला आहे. मागील लोकसभा निवडणुकीमध्ये गजानन कीर्तिकर यांनी जरी पराभव केला असला तरी पराभवानंतर आपण या लोकसभा मतदारसंघांमध्ये मागील पाच वर्षे काम केलं आहे. आपण या मतदारसंघात लोकसभेची तयारी जोमाने केली असल्याचं संजय निरूपम यांचं म्हणणं आहे.

संजय निरुपम यांचा आक्षेप नेमका काय?

शिवसेना ठाकरे गटाने जाहीर केलेले उमेदवार अमोल कीर्तीकर यांच्यावर कथित खिचडी घोटाळा प्रकरणी मुंबई आर्थिक गुन्हे शाखा आणि ईडीकडून चौकशी सुरू आहे. तरीही अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी जाहीर झाल्याने संजय निरुपम यांनी आक्षेप घेतला आहे. उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचा मोठा मतदार असून शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवाराला हा मतदार पाठिंबा देऊ शकत नाही, असा दावा संजय निरुपम यांनी केला आहे. अमोल कीर्तिकर यांना आतापर्यंत कुठल्याही प्रकारे निवडणुकीचा अनुभव नसताना त्यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवणे हे योग्य नसल्याचं निरुपम यांचं मत आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;