Congress : ‘आम्ही कुटुंबाचे गुलाम बनून राहू शकत नाही’, काँग्रेस आमदारांचे बंडाचे संकेत

Congress : ‘आम्ही कुटुंबाचे गुलाम बनून राहू शकत नाही’, काँग्रेस आमदारांचे बंडाचे संकेत

लोकसभा निवडणुकीसाठी आघाडी-युतीच्या राजकारणात विविध पक्ष उमेदवारी जाहीर करत आहेत. या उमेदवारीवरुन कुठे खुशी तर कुठे नाराजी आहे. काही नाराज तिकीट मिळाल नाही किंवा आपल्या शब्दाला मान दिला नाही, म्हणून पक्ष सोडत आहेत. सध्या बहुतांश पक्षात पक्षांतराचा हा ट्रेंड दिसून येतोय. आता कर्नाटक काँग्रेसमध्ये बंडाचे वारे वाहू लागले आहे. तिकीट वाटपातील नाराजीवरुन कर्नाटक काँग्रेसमधील पाच आमदारांनी राजीनाम्याची धमकी दिली आहे. यात तीन विधानसभेतील आमदार आहेत, दोन विधान परिषदेतील आमदार आहेत.

कोलार लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री केएच मुनीयप्पा यांच्या नातेवाईकाला तिकीट दिली. त्यावरुन ही नाराजी उफाळून आली आहे. कर्नाटकचे उच्च शिक्षण मंत्री डॉ. एमसी सुधाकर म्हणाले की, ‘आम्ही गुलाम नाही असं अन्य आमदारांनी म्हटलय’ आम्ही मुनीयप्पा कुटुंबाचे गुलाम नाही, असं या आमदाराच म्हणणं आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिलय.

पार्टी हायकमांडने म्हणण ऐकून घेतलं, पण….

काँग्रेस पक्ष कुटुंबातच तिकीट वाटप करतोय, अस या आमदारांच म्हणण असल्याच डॉ. एमसी सुधाकर म्हणाले. विधानसभा अध्यक्षांना भेटून राजीनामा देण्याची धमकी या आमदारांनी पार्टी हायकमांडला दिली आहे. त्यांनी आपल नाराजी, असमाधान प्रगट केलय. पार्टी हायकमांडने म्हणण ऐकून घेतलं पण आमच्या मागणीची बिलकुल दखल घेतली नाही असा या आमदारांचा आरोप आहे.

या राज्यात दोन टप्प्यात लोकसभा निवडणूक

21 मार्चला काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. यात कर्नाटकातील 17 उमेदवार आहेत. उमेदवारांची पहिली यादी 8 मार्चला जाहीर झाली होती. कुटुंबातील सदस्याला कोलारमधून तिकीट मिळवून देण्याची इच्छा केएच मुनीयप्पा यांनी याआधी व्यक्त केली होती. कर्नाटकात दोन टप्प्यात लोकभा निवडणूक पार पडणार आहे. 26 एप्रिल आणि 7 मे अशी दोन टप्प्यात लोकसभेची निवडणूक होईल.

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;