Cardiogrit Gold : आयुर्वेदात आहे Cardiotoxicity वर उपचार, पतंजलीच्या नव्या रिसर्चने वेधले जगाचे लक्ष!

Cardiogrit Gold : आयुर्वेदात आहे Cardiotoxicity वर उपचार, पतंजलीच्या नव्या रिसर्चने वेधले जगाचे लक्ष!

Patanjali : कर्करोगावर उपचार करण्यासाठी केमोथेरेपीचा वापर केला जातो. या कमोथेरेपीदरम्यान एक औषध वापरले जाते. या औषधावर हृदयावर घातक परिणाम होतो, असा दावा केला जातो. याच स्थितीला Cardiotoxicity असे म्हटले जाते. मात्र पतंजली या संस्थेने आता Cardiotoxicity वर औषध शोधले आहे. तसे दावा पतंजलीने केलाय. आयुर्वेद आणि आधुनिक विज्ञानाच्या मदतीने हे शक्य असल्याचं पतंजलीने म्हटलं आहे. त्यामुळे आता पतंजलीच्या या नव्या संशोधानाची सगळीकडेच चर्चा होत आहे. पतंजलीने नेमका काय दावा केलाय? ते समजून घेऊ या…

पतंजलीच्या औषधाचे झाले वैज्ञानिक परीक्षण

पतंजलीच्या वैज्ञानिकांनी Cardiogrit Gold नावाचे एक औषध शोधले आहे. या औषधाच्या मदतीने केमोथेरीपीमुळे होणाऱ्या Cardiotoxicity वर मात मिळवता येत, असा दावा पतंजलीने केला आहे. विशेष म्हणजे या औषधाचे वैज्ञानिक परिक्षणही करण्यात आल्याचे पतंजलीने सांगितले आहे. या संशोधातूचे निष्कर्ष आंतरराष्ट्रीय रिसर्च जर्नल Journal of Toxicology यात प्रकाशित झाल्याचेही पतंजलीने सांगितले आहे.

Cardiogrit Gold औषध कसे तयार झाले?

पतंजलीच्या टीमने या औषधाचे परीक्षण C. elegans नावाच्या जीवांवर करण्यात आल्याचे सांगितले आहे. जगभरातील वैद्यकीय संशोधनांत C. elegans यांचा वापर केला जातो. पतंजलीचे Cardiogrit Gold हे औषध या जीवांना देण्यात आले. त्यानंतर या जीवांमध्ये महत्त्वाचे आणि सकारात्मक बदल झाल्याचा दावा पतंजलीने केलाय. या जीवांच्या स्नायूंमध्ये सुधारणा झाली. तसेच त्यांचा आहारही वाढला, या जीवांची लांबी, प्रजनन क्षमताही वाढल्याचा दावा पतंजलीने केला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे Cardiogrit Gold हे औषध दिल्यानंतर C. elegans या जीवांच्या शरीरातील Doxorubicin हा घटक कमी झाला. त्यामुळे आमचे औषध घेतल्यानंतर Cardiotoxicity चे प्रमाण कमी होते, असा दावा पतंजलीने केलाय.

Cardiogrit Gold औषधात नेमकं काय काय आहे?

Cardiogrit Gold या औषधात योगेंद्र रस, अर्जुन, मोती पिष्टी, अकिक पिष्टी अशा औषदी वनस्पतींचा समावेश आहे. जुन्या आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये या वनस्पती हृदयासंबंधीच्या रोगांसाठी गुणकारी असतात, असे नमूद केल्याचे पतंजलीचे म्हणणे आहे.

आचार्य बालकृष्ण यांनी काय प्रतिक्रिया दिली?

दरम्यान, पतंजलीचे आचार्य बालकृष्ण यांनी या संशोधनाबाबत प्रतिक्रिया दिलेली आहे. या प्रयोगातून आयुर्वेदाची शक्ती समोर आली आहे. तसेच पारंपरिक उपचार पद्धतीचे वैज्ञानिक पद्धतीने परीक्षण केले तर आधुनिक औषधांच्या अनेक अडचणींवर आपल्याला मात करता येते, हेच यातून समोर आलेले आहे. संपूर्ण विश्व आयुर्वेदाकडे आशेने पोहतेय, असे बालकृष्ण यांनी म्हटले आहे.

(Disclaimer: अशा प्रकारचे कोणतेही औषध घेण्याआधी डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्या.)

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

जर तुम्हीही सकाळी रिकाम्या पोटी पाणी पित असाल तर हे नक्कीच जाणून घ्या जर तुम्हीही सकाळी रिकाम्या पोटी पाणी पित असाल तर हे नक्कीच जाणून घ्या
आरोग्याबाबत जागरूक राहायला किंवा निरोगी राहायला सर्वानाच आवडतं.त्यासाठी प्रत्येकजण काहीना काही उपाय करत असतात. या सवयींपैकी एक म्हणजे सकाळी उठल्यानंतर...
झोपताना उशाजवळ लिंबाच्या तुकड्यावर थोडंसं मीठ लावा अन् ठेवा, तुम्हाला हे 5 आश्चर्यकारक फायदे नक्कीच मिळतील
Maratha Reservation – खाऊ गल्ली, हॉटेल बंद, पाण्याचीही सोय नाही, सरकार म्हणजे इंग्रजांपेक्षा बेकार आहे; जरांगेंची महायुतीवर सडकून टीका
Photo – मराठ्यांचे वादळ मुंबईत धडकले
अजित पवारांच्या दिशेने कांद्याची माळ भिरकावण्याचा प्रयत्न, दोघे पोलिसांच्या ताब्यात
फ्रिजमध्ये चुकूनही ठेवू नका ही 5 फळे; अन्यथा आरोग्यावर होईल वाईट परिणाम
Photo – आरक्षणाच्या मागणीवर मराठा ठाम, लाखोंच्या जनसमुदायाने मुंबई व्यापली