मोठी बातमी : छगन भुजबळ यांची लोकसभेची उमेदवारी निश्चित, सुत्रांची माहिती; घडामोडींना वेग

मोठी बातमी : छगन भुजबळ यांची लोकसभेची उमेदवारी निश्चित, सुत्रांची माहिती; घडामोडींना वेग

नाशिक लोकसभेच्या जागेवरून महायुतीत तिढा निर्माण झाला होता. शिवसेना आणि भाजपने या जागेवर दावा केलेला असतानाच अचानकपणे राष्ट्रवादीचे नेते, राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या नावाची चर्चा सुरु झाली. अखेर छगन भुजबळ यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे. छगन भुजबळ नाशिकमधून महायुतीचे उमेदवार असणार आहेत. दिल्लीतून भुजबळांची उमेदवारी निश्चित झाल्याचं माहिती खात्रिलायक सुत्रांनी दिली आहे. आता नाशिकच्या जागेवरचा तिढा सुटला असल्याचं म्हणता येईल. त्यामुळे हालचालींना वेग आला आहे. अजित पवारांनी बोलावलेल्या बैठकीसाठी छगन भुजबळ रवाना झाले आहेत.

अजित पवारांनी बोलावलेल्या बैठकीला हजेरी

लोकसभा निवडणुकीसंदर्भात अजित पवार यांनी आज पुण्यात महत्वाची बैठक बोलावली आहे. माढा, नाशिक आणि सातारा मतदारसंघाची आढावा बैठक आज अजित पवारांनी बोलावली आहे. या बैठकीला छगन भुजबळही उपस्थित राहणार आहेत. छगन भुजबळांसह नाशिक लोकसभेतील अजित पवार गटाचे पदाधिकारी बैठकीला उपस्थित राहणार आहेत. अजित पवारांनी बोलावलेल्या नाशिक लोकसभा मतदारसंघाची बैठकीला नाशिक राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. भुजबळ फार्मवरून भुजबळांसह पदाधिकाऱ्यांचा ताफा पुण्याला रवाना झाला आहे.

भुजबळ काय म्हणाले?

अजित पवारांनी बोलावलेल्या बैठकीला छगन भुजबळ रवाना झाले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. पुण्याला राष्ट्रवादीची बैठक आहे. ज्या जागा आम्हाला मिळणार आहे किंवा शक्यता आहे. जिंकण्याची कितपत तयारी आहे. जिथं जिथं जागा मिळण्याची शक्यता आहे त्याबाबत बैठक अजित पवारांनी बोलावली आहे. पक्षाचा नेता म्हणून अजित दादा आढावा घेणार आहेत, असं छगन भुजबळ म्हणाले.

उमेदवारीवर काय म्हणाले…

दिल्लीतून उमेदवारी निश्चित झाली आहे. यावर तुमचं मत काय? असं विचारण्यात आलं तेव्हा मला कल्पना नाही, मी पुण्याला गेल्यावर विचारतो. जे दिल्लीला गेले होते त्यांना जाऊन विचारतो. अनेकजण इच्छुक आहेत. आम्ही कुणावरही दबाव टाकला नाही. मी राष्ट्रवादी पक्षात, माझ्या पक्षातर्फे लढणार, पक्ष बदलण्याचा प्रश्न येत नाही. ज्या पक्षाला जागा सुटेल तो लढेल. ज्या गटाचा उमेदवार असेल त्याला 100 टक्के निवडून आणण्याचा प्रयत्न करणार, असं भुजबळ म्हणाले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;