स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत व्हीव्हीपॅट वापरा, काँग्रेसची निवडणूक आयुक्तांकडे मागणी
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत व्हीव्हीपॅट वापरा, अशी मागणी काँग्रेसने राज्याचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांच्याकडे आज केली.
प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या शिष्टमंडळाने आज दिनेश वाघमारे यांची भेट घेतली. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव प्रफुल्ल गुडधे-पाटील, प्रदेश काँग्रेसचे कोषाध्यक्ष अभय छाजेड, डॉ. झिशान हुसेन, इरफान पठाण, नाशिक शहर काँग्रेस अध्यक्ष आकाश छाजेड आदींचा शिष्टमंडळात समावेश होता.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅट वापरणार नाही अशी भूमिका निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे; परंतु निवडणुकीतील गैरप्रकार पाहता व्हीव्हीपॅट वापरावे अशी काँग्रेसची मागणी आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List