2019 ला अमोल कोल्हेंनी बेडूक उडी मारली आता मी…; आढळराव पाटलांच्या वक्तव्याची चर्चाच चर्चा

2019 ला अमोल कोल्हेंनी बेडूक उडी मारली आता मी…; आढळराव पाटलांच्या वक्तव्याची चर्चाच चर्चा

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग आला आहे.शिवसेना शिंदे गटाचे नेते, माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील आज राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत. आढळराव पाटील बऱ्याच दिवसांपासून शिरूरमधून लोकसभेची निवडणूक लढण्यासाठी इच्छूक आहेत. महायुतीमध्ये शिरूर लोकसभेची जागा ही राष्ट्रवादीकडे आहे. त्यामुळे या जागेवरून निवडणूक लढण्यासाठी आढळराव पाटील आज राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. या पक्षप्रवेशाआधी टीव्ही 9 मराठीशी बोलताना त्यांनी राज्याचं राजकारण आणि शिरूरमधील लढतीवर भाष्य केलं. तसंच शिरूरची जागा जिंकण्याचा निर्धारही त्यांनी बोलून दाखवला.

अमोल कोल्हेंना टोला

अमोल कोल्हे हे 2019 मध्ये शिवसेनेकडून राष्ट्रवादीमध्ये गेले. ती त्यांची बेडूक उडी होती. पण आता मी तिन्ही पक्षाकडून सहमतीने राष्ट्रावादीमध्ये प्रवेश करत आहे. यात मोठा फरक आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सागितलं की, महायुतीमधून राष्ट्रवादीमधून लढा… मी तयार झालो. आता मी महायुतीचा उमेदवार आहे. मी पक्ष बदलला आहे. पण याचा अर्थ गद्दारी केली असा नाही. 2019 ला कोल्हेंनी मारलेली बेडूक उडी आणि 2024 मी राष्ट्रवादीत करत असलेला प्रवेश… यात फरक आहे, असं शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले.

आज पक्षप्रवेश

गेल्या अनेक दिवसांपासून माझ्या प्रवेशाची चर्चा आहे. ही जागा महायुतीमध्ये कोणाकडे जातेय. यासाठी हा हा विषय रखडला होता. मात्र आता स्पष्ट झालंय की, ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे जातेय. म्हणून तिन्ही पक्षाचा सहमातीचा उमेदवार म्हणून माझी निवड झाली आहे. त्याचाच भाग म्हणून माझा आजचा प्रवेश होत आहेमागच्या निवडणुकीत आमदार पेक्षा जनता माझ्या सोबत राहिली आहे. यावेळची परिस्थिती वेगळी आहे. शिरूरमध्ये माझ्या पाठीमागे पाच आमदार आहेत. अजित पवार यांची ताकत माझ्या पाठीशी उभी आहे. त्यामुळे ही निवडणूक महायुती!, असा विश्वास शिवाजीराव आढळराव पाटील यांनी व्यक्त केला आहे.

मी महायुतीचा उमेदवार- आढळराव

आज मी तिन्ही पक्षाच्या संगनमताने आज माझा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत आहे. मला शिवसेनेची परवानगी की, महायुतीमधील राष्ट्रवादी पक्षामधून निवडणूक लढवावी, असं तिन्ही पक्षांचं ठरलं आहे. पाच आमदार माझ्या सोबत आहे. अजित पवार आणि तिन्ही पक्ष यात समनवयक साधून प्रचार करणार आहेत. आज उमेदवारी जाहीर असून माझा प्रवेश होतोय. आज उमेदवारी जाहीर होईल किंवा नाही. मात्र मीच महायुतीचा उमेदवार असणार आहे, असं आढळराव पाटील म्हणाले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;