Ratnagiri News – एका रूग्णाचा एक्सरे दुसऱ्या रूग्णाला दिला, जिल्हा शासकीय रुग्णालयातील गोंधळ
रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात एका रूग्णाचा एक्सरे दुसऱ्या रूग्णाला देण्याचा प्रकार आज घडला. जो वयोवृद्ध रूग्ण तो एक्सरे घेऊन गेला त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न वॉडबॉयने केला मात्र तो रूग्ण सापडला नाही. अखेर ज्या रूग्णाचा एक्सरे देण्यात आला त्याला परत दुसरी एक्सरे फ्लिम काढून देण्यात आली. अशाप्रकारचे गोंधळ कर्मचारी घालत असल्याने प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.
एका रूग्णाचा मानेचा एक्सरे काढण्यात आला होता. मात्र त्या एक्सरेची फिल्म दुसऱ्याच एका वयोवृद्ध रूग्णाला देण्यात आली. जेव्हा मानेचा एक्सरे काढलेला रूग्ण फिल्म न्यायला आला तेव्हा तेथील कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले की, ती एक्सरे फिल्म एका वयोवृद्ध रूग्णाला देण्यात आली. त्यानंतर वॉडबॉयने रूग्णालयाच्या आवारात त्या वयोवृद्ध रूग्णाचा शोध घेतला. मात्र तो सापडला नाही.
प्रशासनातील त्रुटी
रूग्णांना एक्सरे फिल्म देताना ती पाकिटात टाकून दिली जात नाही. एक्सरे फिल्मवर बारीक अक्षरात रूग्णाचे नाव येते. मात्र सर्वच रूग्णांना किंवा नातेवाईकांना ते समजत नाही. त्यामुळे एक्सरे फिल्म पाकिटात टाकून त्यावर रूग्णाचे नाव लिहून दिल्यास असे गोंधळ होणार नाहीत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List