दिल्ली-लंडन एअर इंडिया बोईंग ड्रीमलाइनरमध्ये तांत्रिक बिघाड, उड्डाण रद्द
दिल्लीहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाचे बोईंग 787 ड्रीमलाइनर विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने उड्डाण रद्द करण्यात आले. तांत्रिक समस्येमुळे दिल्ली विमानतळावरील पार्किंग बेमध्ये विमान परत नेले, असे एअरलाइनच्या प्रवक्त्याने सांगितले. एअर इंडियाचे विमान एआय 2017 दिल्लीहून लंडनला जाणार होते. आमच्या प्रवाशांची सुरक्षा आणि कल्याण ही सर्वोच्च प्राथमिकता आहे, असे एअर इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले.
विमानात तांत्रिक समस्या असल्याचे निदर्शनास आल्याने वैमानिकांनी उड्डाण रद्द करण्याचा निर्णय घेतला. यानंतर मानक ऑपरेटिंग प्रक्रिया सुरू करण्यासाठी आणि खबरदारीच्या तपासणीसाठी विमान परत आणण्याचा निर्णय घेतला, असे प्रवक्त्याने सांगितले. प्रवाशांना लवकरात लवकर लंडनला नेण्यासाठी दुसऱ्या विमानाची व्यवस्था करण्यात येत आहे. एअर इंडियाचा ग्राउंड स्टाफ प्रवाशांची काळजी घेत आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List