महादेव मुंडे यांच्या हत्येप्रकरणी SIT स्थापन करण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश
परळीत महादेव मुंडे यांची निर्घुण हत्या करण्यात आली होती. हत्या होऊन दोन वर्षांचा कालावधी उलटून गेला आहे. परंतु मुंडे कुटुंबाला अजूनही न्याय मिळालेला नाही, पोलिसांनी अद्याप कुणालाटी आटक केलेलं नाही. त्यामुळे न्यायाच्या प्रतिक्षेत असलेल्या मृत महादेव मुंडे यांच्या पत्नी आणि कुटुंबाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या भेटीमध्ये झालेल्या चर्चेत महादेव मुंडे यांच्या हत्येप्रकरणी SIT स्थापन करण्याचे आदेश देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे आणि त्यांच्या कुटुंबाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर ज्ञानेश्वरी मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या भेटीची माहिती दिली. त्या म्हणाल्या की, “महादेव मुंडे यांची हत्या झाल्यानंतर गेल्या 21 महिन्यांचा वृत्तांत मी मुख्यमंत्र्यांना सांगितला आहे. हे सर्व एकूण मुख्यमंत्री भावुक झाले असून या प्रकरणात कोणीही असले तरी त्याला सोडणार नाही, असा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे. तसेच SIT नेमून आरोपींना अटक करण्याचे आदेश दिले आहेत. बीडच्या एसपींना फोन लावून या प्रकरणी कारवाई करण्याच आदेश दिले आहे.” अशी माहिती ज्ञानेश्वरी मुंडे यांनी दिली आहे.
महादेव मुंडे यांच्या हत्येप्रकरणी आणि ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केलेल्या मागणीनुसार पंकज कुमावत यांच्या अध्यक्षतेखाली SIT ची स्थापना करण्यात आली आहे. परळीमध्ये दोन वर्षांपूर्वी 21 ऑक्टोबर 2023 रोजी महादेव मुंडे यांची हत्या करण्यात आली होती. महादेव मुंडे यांच्या हत्येमागे वाल्मिक कराड आणि त्याचा मुलगा सहभागी असल्याचा आरोप केला जात आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List