तारीफही तारीफमध्ये टॅरिफ लावला! पंतप्रधान मोदी आणि हिंदुस्थानसाठी मोठा धक्का; जयराम रमेश यांचा ट्रम्प यांच्या निर्णयावरून टोला
हिंदुस्थानावर लावण्यात आलेल्या टॅरिफचे तीव्र पडसाद आता देशभरामध्ये उमटू लागले आहेत. यावर आता विरोधक चांगलेच संतापले आहेत. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी एएनआय वृत्तसंस्थेला सांगितले की, तारीफही तारीफमध्येच टॅरिफ लावण्यात आलेला आहे. आता पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या एकमेकांच्या कौतुकाला काही अर्थ नाही.
माजी केंद्रीय मंत्री रमेश यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केले, राष्ट्रपती ट्रम्प यांनी हिंदुस्थानातून होणाऱ्या आयातीवर 25 टक्के शुल्क आणि दंड लादला आहे. आता त्यांच्या आणि हाउडी मोदी यांच्यातील या सर्व कौतुकाला काही अर्थ नाही.
भारत के प्रति राष्ट्रपति ट्रंप के तेवर लगातार सख्त होते जा रहे हैं!
10 मई से अब तक ट्रंप 30 बार यह दावा कर चुके हैं कि उन्होंने ऑपरेशन सिंदूर को रुकवाया। ये दावे उन्होंने चार अलग-अलग देशों में किए हैं।
18 जून को उन्होंने व्हाइट हाउस में पाकिस्तान सेना प्रमुख और पहलगाम आतंकी…
— Jairam Ramesh (@Jairam_Ramesh) July 31, 2025
पंतप्रधान मोदींवर हल्ला चढवत ते म्हणाले, ट्रम्प यांनी 30 वेळा ऑपरेशन सिंदूर थांबवण्याचे दावे केले, त्यानंतर त्यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याची योजना आखणाऱ्या पाकिस्तानी लष्करप्रमुखांना त्यांच्या घरी जेवणासाठी आमंत्रित केले. अमेरिकेने पाकिस्तानला आयएमएफ आणि जागतिक बँकेकडून आर्थिक पॅकेजसाठी पाठिंबाही दिला.
जयराम रमेश या संपूर्ण मुद्द्यावर अधिक बोलताना म्हणाले की, स्तुती आणि ‘हाउडी मोदी’ आणि ‘नमस्ते ट्रम्प’ त्याचा काही उपयोग झाला नाही. ट्रम्प यांनी 30 वेळा दावा केला की, त्यांनी युद्धबंदी पूर्ण केली. जेणेकरून हिंदुस्थान आणि अमेरिका यांच्यात एक चांगला व्यापार करार होऊ शकेल. पण तसे झाले नाही. आजच 25 टक्के कर आकारला जाईल आणि दंडही आकारला जाईल अशी घोषणा करण्यात आली… मग या मैत्रीतून आपल्याला काय मिळाले? पंतप्रधान मोदी गप्प आहेत. हा आपल्या देशासाठी एक मोठा धक्का आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List