Hair Care – केसांना मेहंदी लावण्याचे खूप सारे फायदे, वाचा

Hair Care – केसांना मेहंदी लावण्याचे खूप सारे फायदे, वाचा

केसगळती हा प्रश्न अलीकडे सर्वांनाच सतावत आहे. केस गळतीचे प्रमाण वाढल्यामुळे, सौंदर्यामध्येही बाधा येते. महिलांसाठी केसगळती ही डोकेदुखी ठरत आहे. म्हणूनच केसगळतीवर अनेक उपाय करण्याचा प्रयत्न केला जातो. असे असले तरीही, वातावरणात बदल झाल्यावर आपल्याला आरोग्याची काळजी घ्यावी लागते. यामध्ये खासकरून केसांची निगा राखणे हे गरजेचे असते. प्रदुषणामुळे केस खूपच कोरडे होऊ लागतात.

आपल्या केसांमध्ये कोंड्याची समस्या ही प्रदुषणामुळे सर्वाधिक प्रमाणात वाढते. त्यामुळे केसांची काळजी घेण्यासाठी नैसर्गिक उपचार म्हणून मेंदीचा वापर केला जातो. मेंदीचा वापर आपल्याकडे फार पूर्वापार केला जात आहे. नैसर्गिक घटक असलेली मेंदी ही केसांच्या पोषणासाठी कायम गरजेची आहे. कुठलेही केमिकलयुक्त घटक केसांना हानिकारक ठरतात. परंतु मेंदी मात्र केसांसाठी कायमच गुणकारी ठरलेली आहे.

Hair Care – केस धुतल्यानंतर ‘ही’ चूक पडू शकते महागात, वाचा

नारळाचे तेल, लिंबाचा रस आणि मेंदीचा हेअर पॅक –

एका वाडग्यात चार चमचे मेंदी पावडर घ्या आणि त्यात थोडे खोबरेल तेल घाला. तसेच एक चमचा ताज्या लिंबाचा रस घाला आणि सर्व साहित्य एकत्र करा. हा हेअर पॅक केसांवर लावा. 30-45 मिनिटे तसेच ठेवावे. त्यानंतर धुण्यासाठी सौम्य शैम्पू वापरा. त्यानंतर कंडिशनर देखील लावा. हा मेंदीचा हेअर पॅक आठवड्यातून एकदा वापरल्यास उत्तम.

केसांना मेहंदी लावण्याचे फायदे

मेंदीचा सर्वात लोकप्रिय वापर नैसर्गिक केसांचा रंग म्हणून आहे. तथापि पांढरे केस रंगवण्याव्यतिरिक्त मेंदीचे केसांसाठी इतर अनेक फायदे आहेत.

मेहंदी आपल्याला कोंड्यापासून मुक्त होण्यास मदत करू शकते. अलीकडे बहुतेकजण कोंड्यामुळे त्रस्त आहेत. डोक्यातील कोंडा ही एक जुनी समस्या आहे.

डोक्यातील कोंड्यावर उपचार करण्यासाठी नैसर्गिक उपाय म्हणून केवळ एकच नाव ते आहे मेहंदी.  मेंदीने तुम्ही अनेक प्रकारचे हेअर मास्क बनवू शकता.

मेंदीमुळे केसांना योग्य ते पोषण मिळते. तसेच मेंदीमुळे केसांना कुठलीही हानी पोहोचत नाही. त्यामुळे महिन्यातून किमान एकदा मेंदी वापरणे हे हितावह आहे.

(कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;