Maharashtra Monsoon Session 2025 – मंगळसूत्र चोराचा… मंगळसूत्र चोराचा..! जितेंद्र आव्हाडांनी घोषणा देत गोपीचंद पडळकरांना डिवचलं
विधिमंडळात प्रवेश करत असताना राष्ट्रवादी शरदचंद्र काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मंगळसूत्र चोराचा…मंगळसूत्र चोराचा… अशा घोषणा दिल्या. जितेंद्र आव्हाड यांच्या या घोषणांनी विधिमंडळ आवारात उपस्थित सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
राष्ट्रवादी शरदचंद्र काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे एवढचं नव्हे तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भाजप आमदार गोपीचंद पडळकर सतत पातळी सोडून टीका करत असतात. या पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड यांनीही संधी साधत गोपीचंद पडळकर यांना डिवचलं. विधिमंडळात प्रवेश करत असताना गोपीचंद पडळकर हे काहीजणांशी बोलत होते. त्यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी तिथून जात असताना मंगळसूत्र चोराचा… मंगळसूत्र चोराचा… अशा घोषणा दिल्या. आणि सर्वांचे लक्ष वेधून घेतले. गोपीचंद पडळकरांवर मंगळसूत्र चोरीप्रकरणी पोलिसांनी कारवाई करत अटक केली होती, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते प्रशांत जगताप म्हणाले होते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List