Skin Care – चेहरा सुंदर ठेवण्यासाठी रोज किमान एक बीट खायलाच हवं, वाचा

Skin Care – चेहरा सुंदर ठेवण्यासाठी रोज किमान एक बीट खायलाच हवं, वाचा

निरोगी आहार हा एक महत्त्वाचा विषय आहे. आहारात विविध फळे तसेच ठराविक भाज्यांचा आहारात समावेश करणे गरजेचे असते. विविध प्रकारच्या कोशींबीरी आपण आहारात समाविष्ट करण्याचा सल्ला हा डाॅक्टरांकडूनही दिला जातो. आहारात कोशींबीरीचा समावेश खूप महत्त्वाचा आहे. म्हणूनच गाजर, बीट, कांदा, टोमॅटो, काकडी यासारख्या भाज्यांना आता बारमाही महत्त्व प्राप्त झाले आहे. बीटचा वापर आहारामध्ये मोठ्या प्रमाणात करण्याचा सल्ला म्हणून दिला जातो.

बीट आपला रोजचा स्टॅमिना वाढविण्यासाठी सुद्धा महत्त्वाचे कार्य करते. बीटमध्ये आॅक्सिजनचे प्रमाण अधिक असल्याकारणाने, शरीर ताजेतवाने राहते. म्हणूनच खेळाच्या आधी खेळाडू देखील बीटाचा रस घेताना आढळतात.

चेहरा काळवंडल्यास बीटाचा उपयोग करता येतो. बीट फेस मास्क हा चेहऱ्यावरील काळेपणा दूर करण्यासाठी उपयुक्त आहे. आयरनचे प्रमाण जास्त असल्यामुळे, चेहऱ्यावर उजळपणा येण्यास मदत होते.

Skin Care – दररोज चेहऱ्यावर तांदळाचे पीठ लावणे योग्य आहे का?

रक्ताची कमतरता असलेल्यांसाठी बीट खाणं हे वरदान मानले जाते. बीटामध्ये आयरनची मात्रा मोठ्या प्रमाणावर असते. त्यामुळेच रक्ताची कमतरता असलेल्यांना डाॅक्टरच बीट खा किंवा बीटाचा ज्यूस पिण्याचा सल्ला देतात.

बीटाचे सेवन हे पोटाच्या आरोग्यासाठी सुद्धा खूप उत्तम मानले जाते. भरपूर प्रमाणात बीटामध्ये फायबरचे गुणधर्म असल्यामुळे, पोटांच्या तक्रारीवर बीट खूप गुणकारी आहे. अपचनाच्या समस्येसाठी बीट सलाड खाण्याचा सल्ला म्हणून दिला जातो.

वाढत्या वयामध्ये बीट खाणे गरजेचे आहे. कारण यामुळे मेंदुचे आरोग्य सुधारले जाते, तसेच रक्तदाबही नियंत्रित राहतो. बीटरुटचा रस रोज प्यायला असता ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास होतो, अशांचा रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते. यामुळेच हृद्यविकाराचा धोका कमी होण्यास मदत होते.

(कोणतेही उपाय करताना तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कन्नडिगांची मुजोरी! बेळगाव महापालिकेने हटविले गणेशोत्सवाचे मराठी फलक कन्नडिगांची मुजोरी! बेळगाव महापालिकेने हटविले गणेशोत्सवाचे मराठी फलक
बेळगावातील भगतसिंग चौक पाटील गल्लीतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे गणेशोत्सवाचे मराठी भाषेत फलक लावले होते. ते फलक रात्रीच्या रात्रीत बेळगाव महापालिकेने...
फडणवीसांच्या मंत्रीमंडळातले 75 टक्के मंत्री युजलेस, ते मंत्री म्हणून नाही तर दरोडेखोर म्हणून काम करतात; संजय राऊत यांचा घणाघात
डान्सबार चालवणारे मंत्री कॅबिनेटमध्ये घेता आणि चांद्यापासून बांद्यापर्यंत नैतिकतेच्या गप्पा मारता, संजय राऊत यांचा फडणवीसांना टोला
अल्पवयीन मुलीवर तिघांचा सामूहिक बलात्कार, गरोदर राहिल्यावर केला जिवंत गाडण्याचा प्रयत्न
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाची पुनर्रचना, बेलापूर आता नवे परिमंडळ; आयुक्तालयात तीन उपायुक्त
वृद्ध मातापित्यांना सांभाळण्यासाठी 30 दिवसांची भरपगारी रजा, केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय
ड्युटीवर असताना मृत्यू झाल्यास कुटुंबाला मिळणार 50 हजार रुपये, पीएफ कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा