चंद्रपूरच्या जागेचा सस्पेन्स अखेर संपला, काँग्रेसकडून उमेदवाराची घोषणा

चंद्रपूरच्या जागेचा सस्पेन्स अखेर संपला, काँग्रेसकडून उमेदवाराची घोषणा

काँग्रेसकडून अखेर चंद्रपूरच्या जागेसाठी उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातच चंद्रपूरमध्ये मतदान होणार आहे. पण काँग्रेसकडून अजूनही उमेदवाराची घोषणा करण्यात आली नव्हती. या मतदारसंघासाठी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचं नाव समोर येत होतं. तसेच त्यांच्या कन्या शिवाजी वडेट्टीवार यादेखील चंद्रपूर लोकसभेच्या जागेवर निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असल्याची माहिती समोर येत होती. तर दुसरीकडे काँग्रेसचे दिवंगत खासदार बाळू धानोरेकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यादेखील इच्छुक असल्याची माहिती समोर येत होती. प्रतिभा धानोरकर यांनी मतदारसंघात प्रचारालाही सुरुवात केली होती. तसेच त्यांनी आपली नाराजीदेखील बोलून दाखवली होती. प्रतिभा धानोरकर दिल्लीत जावून काँग्रेस पक्षश्रेष्ठींना भेटून आल्या होत्या. त्यानंतर त्यांना आज पक्षाकडून उमेदवारी जाहीर झाली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;