खासदारकीचं तिकीट कापल्यानंतर भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांचं पहिल्यांदाच स्पष्टीकरण, म्हणाले…

खासदारकीचं तिकीट कापल्यानंतर भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांचं पहिल्यांदाच स्पष्टीकरण, म्हणाले…

उत्तर मुंबईतील भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी यांचे तिकीट रद्द झाल्यानंतर गोपाल शेट्टी यांनी आज पहिल्यांदाच ‘टीव्ही 9 मराठी’सोबत मनमोकळेपणाने चर्चा केली. मी पक्षावर नाराज नाही, असं गोपाळ शेट्टी यांनी यावेळी स्पष्ट केलं. तसेच आपण पक्षासाठी काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं. “तिकीट अनेक लोकांना मिळतं. अनेक लोकांना मिळत नाही. ज्यांची अपेक्षा नसते अशा लोकांना तिकीट मिळतं. पक्षाने तिकीट नाही दिलं तर त्यामागे काही कारण असेल”, असं गोपाळ शेट्टी म्हणाले. मी इतकी कामे केली आहेत. त्यामुळे पक्षाने तिकीट दिलं नाही म्हणून कार्यकर्त्यांची आणि मतदारांची नाराजी असणं हे स्वभाविक आहे. पण आधी पेक्षा जास्त आणि चांगल्या मतांनी आमचे मतदार पियूष गोयल यांना निवडून आणण्याचा माझा प्रयत्न आहे. दोनदा महाराष्ट्रात मी एक नंबरचे स्थान प्राप्त केलं. तिसरांदा हॅट्रिक सर्वजण मिळून करतील, असं गोपाळ शेट्टी म्हणाले.

“मी जे करू शकलो नाही ते पियूष गोयल करतील. कारण ते केंद्रात मंत्री आहे. मी आमदार प्रवीण दरेकर यांचं उदाहरण देतो. जेव्हा प्रवीण दरेकर आमदार म्हणून जितकं मागाठाणे मतदारसंघातील लोकांना भेटत होते आणि आता दरेकर यांना महाराष्ट्राची जबाबदारी दिली गेली तर ते महाराष्ट्रभर फिरत असतात. तर ते लोकांना कमी भेटतात. पियूष गोयल मंत्री आहेत. केंद्राचे मंत्री आहेत. संपूर्ण देश बघायचं आहे. हे लोकांना समजून घ्यायला पाहिजे. उत्तर मुंबईमध्ये इतके नगरसेवक आहेत, सक्षम आमदार आहेत आणि मी सुद्धा इथेच राहणार आहे. आता पहिल्यापेक्षा अधिक सुविधा लोकांना मिळणार आहेत”, असा विश्वास गोपाळ शेट्टी यांनी व्यक्त केला.

गोपाळ शेट्टी यांचं विनोद घोसाळकर यांना प्रत्युत्तर

यावेळी गोपाळ शेट्टी यांनी ठाकरे गटाचे नेते विनोद घोसाळकर यांच्या दाव्यालाही प्रत्युत्तर दिलं. “ते म्हणतात जिंकणार आणि आम्ही म्हणतो आम्ही जिंकू. आता निवडणुकीत कळेल ना काय होईल. पक्षाच्या नेत्यांसोबत आमची कुठल्याही प्रकारची चर्चा झालेली नाही. मला ओळखणाऱ्या मतदारांना माहीत आहे की, गोपाल शेट्टी काय आहे”, असं गोपाळ शेट्टी म्हणाले.

‘मी कुठल्याही पक्षात जाणार नाही’

“सर्व पक्षाच्या नेत्यांची सहानुभूती माझ्यावर कालही होती आणि आजही आहे. तसेच उद्याही राहणार आहे. कारण माझं काम सर्वांनी पाहिलं आहे. मी कुठल्याही पक्षात जाणार नाही. मी इथेच राहणार आहे”, असं गोपाळ शेट्टी यांनी स्पष्ट केलं. “मी मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांना जाऊन भेटलो आणि मी त्यांना सांगितलं मी पक्षाबरोबर आहे. काही काळजी करण्याचं कारण नाही. मी कामाला लागलो आहे. मुंबईतील शेवटच्या मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. जोपर्यंत मतदान आहे तोपर्यंत आमचं काम असंच सुरू राहणार आहे. भविष्याचं आपण नंतर विचार करू”, असं गोपाळ शेट्टी म्हणाले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;