Hair Care – केसांच्या घनदाट वाढीसाठी जास्वंदीचे फूल आहे रामबाण उपाय, वाचा

Hair Care – केसांच्या घनदाट वाढीसाठी जास्वंदीचे फूल आहे रामबाण उपाय, वाचा

आपल्या केसांचं आरोग्य उत्तम राखण्यासाठी जास्वंदीचे फूल हे खूप महत्त्वाचे आहे. आयुर्वेदामध्ये जास्वंदीच्या फुलाला औषधाइतके महत्त्व आहे. अकाली केस पांढरे होण्याच्या प्रक्रीयेवर या फुलाच्या वापराने केस अकाली पांढरे होण्यास प्रतिबंध होतो. तसेच या फुलामध्ये व्हिटॅमिन सी, फ्लेव्होनोइड्स, एमिनो अॅसिड, म्यूसिलेज फायबर, आर्द्रता आणि अँटीऑक्सिडंट्स असल्यामुळे केसांसाठी हे सर्व घटक महत्त्वाचे आहेत.
निरोगी केसांसाठी जास्वंद हेअर मास्क खूप गरजेचा आहे.

जास्वंद आणि दही हेअर मास्क

3 ते 4 ताजी जास्वंद फुले नीट धुवून त्याची पेस्ट बनवावी. फुलांच्या पेस्टमध्ये 2-3 चमचे ताजे दही घाला आणि दोन्ही चांगले मिसळा. हे सर्व  केसांवर लावून चांगला मसाज करावा. एकदा पूर्ण झाल्यावर, आपले केस शॉवर कॅपने झाकून ठेवा आणि एक तास मिश्रण तसेच ठेवावे. त्यानंतर केस धुवावेत.

जास्वंदीची 6 ते 8 ताजी लाल फुले घ्यावीत. यामध्ये काही जास्वंदीच्या झाडाची पानेही घ्यावीत. चांगले धुवून मिक्सरमधून पेस्ट तयार करा. ही पेस्ट केसांवर लावून हलक्या हाताने मसाज करा. सुमारे एक तास तसेच ठेवून द्यावे. त्यानंतर डोके धुवावे. निरोगी केसांसाठी तुम्ही आठवड्यातून दोनदा वापरू शकता.

जास्वंद आणि नारळाचे तेल केसांसाठी अतिशय उपयुक्त आहे.

Hair Care – पावसाळ्यातील केसगळतीवर फक्त 7 रुपये होईल खर्च, वाचा सविस्तर

जास्वंद नारळ तेल हेअर मास्क कसा कराल?

6 ते 8 ताजी लाल जास्वंद आणि थोडी जास्वंदीची पाने घ्यावीत. सर्व नीट धुवून घ्यावे. बारीक करून एक पेस्ट बनवावी. यामध्ये थोडे खोबरेल तेल घालावे. ते एकत्र मिसळून मिश्रण केसांवर नीट लावावे. किमान 45 ते 60 मिनिटे तसेच ठेवावे. त्यानंतर सौम्य शैम्पू वापरून कोमट पाण्याने डोके धुवावे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 26 जुलै 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 26 जुलै 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस
>> योगेश जोशी, [email protected] मेष ग्रहस्थिती – चंद्र पंचम स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात आजचा दिवस – आजचा दिवसात...
खडकवासला मतदारसंघ, मशीनमधील मतदान स्लिप गहाळ झाल्याचा आरोप
मोदींच्या परदेश दौऱ्यावर पाच वर्षांत 362 कोटींचा चुराडा
मुंबईत कायद्याचे राज्य राहणार नाही, हायकोर्टाचे गंभीर निरीक्षण; महापालिकेत नक्कीच चुकीचं घडतंय 
100 दिवसांच्या प्रगतीपुस्तकात शिंदेंचा गृहनिर्माण विभाग मागेच, 66 पैकी 21 उद्दिष्टे अद्याप गाठता आली नाहीत
ट्रेंड – हरे कृष्ण…
घरात ढेकूण झाले तर काय करावे? हे करून पहा