भाजप आमदार पडळकरांच्या निकटवर्तीयांनी 82 वर्षीय वृद्धेला घातला लाखोंचा गंडा, खोट्या दस्तांवर अंगठा घेऊन 17 एकर जागा हडपली; गृहखात्याच्या अकार्यक्षमतेविरोधात तीव्र संताप

भाजप आमदार पडळकरांच्या निकटवर्तीयांनी 82 वर्षीय वृद्धेला घातला लाखोंचा गंडा, खोट्या दस्तांवर अंगठा घेऊन 17 एकर जागा हडपली; गृहखात्याच्या अकार्यक्षमतेविरोधात तीव्र संताप

संजय गांधी निराधार योजनेतून निवृत्ती वेतन सुरू करतो, अशी बतावणी करून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या निकटवर्तीयांनी 82 वर्षीय वृद्धेला लाखोंचा गंडा घातल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. यामध्ये खोट्या दस्तांवर वृद्धेचा अंगठा घेऊन तब्बल 17 एकर जमीन हडपण्यात आली आहे. यामुळे राज्यात गृहखात्याच्या अकार्यक्षमतेविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

सांगली जिल्ह्यातील या गरीब निराधार वृद्धेला आपली जमीन विकायची नव्हती. मात्र गोपीचंद पडळकर यांचा भाऊ आणि फार्म हाऊसचा मॅनेजर यांनी वृद्धेला अक्षरशः उचलून आटपाटी कार्यालयात नेले. या ठिकाणी वृद्धेला कोणतीही सूचना न देता मनमानीपणे दस्तांवर अंगठे लावण्यास भाग पाडले. या जमिनीच्या बदल्यात 1500 रुपये खायला आणि पेन्शन सुरू करून देतो असे लुटारूंनी भासवले. मात्र  वृद्धेची फसवणूक करून पैसेच दिले नाहीत. लुटारूंकडून मात्र पैसे दिल्याचा दावा केला जात आहे.

कुणीही दाद घेईना, म्हणून आझाद मैदानात

आपल्या जमिनीचे पैसे मिळाले नसल्याचे या वृद्धेकडून सांगितले जात आहे. या फसवणुकीविरोधात जिल्हाधिकारी कार्यालय आणि पोलिसांकडे वारंवार खेटे मारूनही कोणताही न्याय मिळाला नाही. म्हणूनच 3 जुलैपासून आझाद मैदानात आंदोलन सुरू असल्याचे अन्यायग्रस्त वृद्धेकडून सांगण्यात आले. यासाङ्गी आपण न्यायालयातही दाद मागणार असल्याचे त्या म्हणाल्या.

तक्रार करू नये म्हणून धमक्या

विठाबाई या पडळकरांच्या भावकीमधल्याच आहेत. मात्र आमदार असलेल्या पडळकरांनी विठाबाईंना कोणत्याही प्रकारची मदत केली नाही. अन्यायाविरोधात तक्रार करू नये यासाठी वृद्धेला धमक्याही दिल्या जात आहेत. त्यामुळे सरकारने आंदोलनाची दखल घेऊन न्याय द्यावा, अशी मागणी विठाबाई यांनी केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

गूगल मॅपने धोका दिला, चुकीचा मार्ग दाखवल्याने गाडी थेट ओढ्यात गूगल मॅपने धोका दिला, चुकीचा मार्ग दाखवल्याने गाडी थेट ओढ्यात
अज्ञात मार्ग दाखवण्यासाठी गूगल मॅपची मोठी मदत होत असल्याने प्रत्येक जण याचा वापर करतो. मात्र याच गूगल मॅपमुळे जीव धोक्यात...
महायुतीत मंत्र्यांमध्ये जुंपली; सामाजिक न्याय विभागाची माधुरी मिसाळ यांनी परस्पर घेतली बैठक, शिरसाट यांनी व्यक्त केली नाराजी
Judge Cash Row – न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्यावर राज्यसभेत महाभियोगाची प्रक्रिया चालणार नाही!
Video – पंतप्रधान मोदी म्हणजे मीडियाने फुगवलेला फुगा, राहुल गांधी यांची सडकून टीका
हाडात जमलेले युरिक एसिड असे बाहेर काढा, हे 4 उपाय नक्की आजमावा
कारवाई केली नाही तर कोडगेपणा तयार होईल; वादग्रस्त मंत्री, आमदारांवरून मुख्यमंत्री फडणवीसांनी अजित पवार, मिंध्यांचे कान टोचले!
माघी गणपतीच्या विसर्जनाला परवानगी द्या, सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची मागणी