नाश्त्यात शिळी चपाती का खायला हवी, वाचा

नाश्त्यात शिळी चपाती का खायला हवी, वाचा

आपल्या स्वयंपाकघरात दररोज ताजी चपाती बनवणे ही एक सामान्य गोष्ट आहे. पण बऱ्याचदा रात्री केलेल्यांपैकी काही चपात्या उरतात. त्या चपात्या काहीजण सकाळी गरम करून चहासोबत वैगरे खातात. पण काहीजण त्या फेकून देतात. कारण अनेकांना असं वाटतं की शिळी चपाती खाल्ली तर त्रास होऊ शकतो म्हणून काही जण त्या फेकून देतात. पण तुम्हाला माहिती आहे का की शिळी चपाती खूप फायदेशीर ठरू शकते. आयुर्वेद आणि घरगुती उपचारांमध्ये, शिळ्या चपातीला औषध म्हणून पाहिले जाते. कोणत्या लोकांनी नाश्त्यात शिळी चपाती खाल्ली पाहिजे. जाणून घेऊया

मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर

शिळ्या चपातीमध्ये असलेले कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स हळूहळू विघटित होतात, ज्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण अचानक वाढत नाही. सकाळी रिकाम्या पोटी थंड दुधात भिजवलेली शिळी चपाती खाल्ल्याने साखरेची पातळी नियंत्रणात राहते. मधुमेहाच्या रुग्णांना आराम मिळण्यासाठी प्राचीन काळापासून ही पद्धत अवलंबली जात आहे. त्यामुळे शरीराची ऊर्जा देखील टिकून राहते आणि भूक लवकर लागत नाही.

अ‍ॅसिडिटी आणि गॅसची समस्या असलेल्यांसाठी फायदेशीर

पोटात जळजळ, आंबट ढेकर किंवा अ‍ॅसिडिटीसारख्या समस्या असलेल्यांसाठी शिळी चपाती आरोग्यदायी आहे. शिळी चपाती शरीराची उष्णता कमी करते आणि पोटाला थंडावा देते. दही किंवा थंड दुधासोबत शिळी चपाती खाल्याने पोटातील उष्णता आणि अ‍ॅसिडिटी दोन्हीपासून आराम मिळतो.

उच्च रक्तदाबाच्या रुग्णांसाठी फायदेशीर

उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी जास्त मीठ आणि तेलकट पदार्थ खाणे टाळावे. जर शिळी चपाती मीठाशिवाय दह्यासोबत खाल्ली तर ती रक्तदाब नियंत्रित करण्यास देखील प्रभावी ठरते.

वजन कमी करू इच्छिणाऱ्यांसाठी फायदेशीर

वजन कमी करू इच्छिणाऱ्यांसाठी शिळी चपाती फायबरचा एक उत्तम स्रोत आहे. शिळी चपाती खाल्ल्यनंतर भरपूर वेळापर्यंत भूक लागत नाही.जास्त खाण्याची सवय देखील कमी होते. तसेच पचनाची समस्या सुधारते आणि चयापचय गतिमान करते.

बद्धकोष्ठता आणि अपचनाचा त्रास असलेल्यांसाठी फायदेशीर

शिळी चपाती खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते. शिळी चपातीमध्ये फायबरचे प्रमाणही जास्त असते. जे सहज पचते आणि पोट सहज साफ होण्यास मदत करते. दररोज सकाळी दही किंवा थंड दुधात भिजवून शिळी भाकरी खाल्ल्याने बद्धकोष्ठता दूर होते.

ऊर्जेची कमतरता आणि थकवा असलेल्या लोकांसाठी फायदेशीर

जर तुम्हाला लवकर थकवा जाणवत असेल किंवा शरीरात ऊर्जा कमी असेल तर शिळी चपाती मदत करू शकते. त्यात असलेले पोषक घटक शरीराला ऊर्जा देतात आणि दिवसभर ताजेतवाने ठेवतात.

तोंडात अल्सर आणि फोडांपासून आराम मिळतो

तोंडात अल्सर किंवा जळजळ होण्याची समस्या जास्त जाणवत असल्यास, दुधात भिजवलेली शिळी चपाती खाल्ल्याने अल्सरपासून आराम मिळतो.

शिळी चपाती कशी खावी?

  • रात्री उरलेली चपाती शक्यतो थंड जागी किंवा फ्रीजमध्ये झाकून ठेवा.

  • सकाळी थंड दुधात किंवा ताज्या दह्यात भिजवून खा.

  • चव वाढवण्यासाठी तुम्ही थोडे गूळ किंवा काळे मीठ देखील घालू शकता.

  • लक्षात ठेवा, चपाती 10 किंवा 12 तासांपेक्षा जास्त शिळी नसावी आणि त्यात कोणताही बुरशी किंवा आंबट वास नसावा.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कन्नडिगांची मुजोरी! बेळगाव महापालिकेने हटविले गणेशोत्सवाचे मराठी फलक कन्नडिगांची मुजोरी! बेळगाव महापालिकेने हटविले गणेशोत्सवाचे मराठी फलक
बेळगावातील भगतसिंग चौक पाटील गल्लीतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे गणेशोत्सवाचे मराठी भाषेत फलक लावले होते. ते फलक रात्रीच्या रात्रीत बेळगाव महापालिकेने...
फडणवीसांच्या मंत्रीमंडळातले 75 टक्के मंत्री युजलेस, ते मंत्री म्हणून नाही तर दरोडेखोर म्हणून काम करतात; संजय राऊत यांचा घणाघात
डान्सबार चालवणारे मंत्री कॅबिनेटमध्ये घेता आणि चांद्यापासून बांद्यापर्यंत नैतिकतेच्या गप्पा मारता, संजय राऊत यांचा फडणवीसांना टोला
अल्पवयीन मुलीवर तिघांचा सामूहिक बलात्कार, गरोदर राहिल्यावर केला जिवंत गाडण्याचा प्रयत्न
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाची पुनर्रचना, बेलापूर आता नवे परिमंडळ; आयुक्तालयात तीन उपायुक्त
वृद्ध मातापित्यांना सांभाळण्यासाठी 30 दिवसांची भरपगारी रजा, केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय
ड्युटीवर असताना मृत्यू झाल्यास कुटुंबाला मिळणार 50 हजार रुपये, पीएफ कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा