हे सरकार दिवाळखोरीत निघाले आहे, ऋण काढून सण साजरे करतायत; अंबादास दानवे यांचा सरकारवर निशाणा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते व विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी बुधवारी विधान भवनाबाहेर प्रसारमाध्यमांशी बोलताना राज्यातील महायुती सरकारवर निशाणा साधला. गिरणी कामगारांचा मोर्चा आणि शिक्षकांच्या मोर्चाबाबत बोलताना दानवे यांनी राज्य सरकारला फटकारले आहे.

आज मुंबईत जवळपास दीड लाख गिरणी कामगारांच्या मागणीसाठी एक भव्य मोर्चा होणार आहे. मुंबईत घरं मिळाली पाहिजे या साठी हा मोर्चा होणार आहे. सरकार या गिरणी कामगारांना मुंबईपासून लांब घरं देऊ पाहतंय. ते स्वीकारलं नाही तर तुमचा घरांवर हक्क राहणार नाही अशी दमबाजी करत आहेत. चढ्ढा प्रायव्हेट लिमिटेड बिल्डर आहे त्याची घरं विकण्यासाठी, त्याचे खिसे भरले जावे म्हणून ही घरं सरकार मिल कामगारांवर थोपवत आहे व त्यांना मुंबई बाहेर पाठवलं जातंय. मुंबई व गिरणी कामगार असं एक अतुट नातं आहे. ते कधीही, कोणत्याही सरकारला तोडता येणार नाही. त्यामुळे आझाद मैदानावरत्यांचा जो मोर्चा आहे त्यात आम्ही सगळे सहभागी होणार आहेत. या प्रश्नाकडे सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतंय. आझाद मैदानावरच शिक्षक उपोषणाला बसले आहेत. ज्या सरकारने टप्पा अनुदानाबाबत स्वत: अध्यादेश काढला आहे. आता त्या मागणीसाठी शिक्षकांना आंदोलन करावं लागत आहे. करा ना टप्पा अनुदान वाढ. पण हे सरकार दिवाळखोरीत निघाले आहे, एक एक पैशासाठी मोहताज झाले आहे. ऋण काढून सण करण्याचं काम सुरू आहे. कर्ज काढून महाराष्ट्राला कर्जात डुबवण्याचं काम सरकार करत आहेत, असे अंबादास दानवे म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

नाभीमध्ये तेल टाकण्याचे जबरदस्त फायदे तुम्हाला माहिती आहेत का? नाभीमध्ये तेल टाकण्याचे जबरदस्त फायदे तुम्हाला माहिती आहेत का?
निरोगी आरोग्यासाठी तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडवणं महत्त्वाचे असते. शरीराशी संबंधित लहान-मोठ्या समस्यांपासून मुक्तता मिळविण्यासाठी नाभीला तेल लावण्याचा सल्ला तुम्ही...
कला केंद्रातील गोळीबारप्रकरणी आमदाराच्या भावासह चौघांना अटक
साई संस्थानला धमकीचा मेल, शिर्डीत खळबळ; सुरक्षा यंत्रणा अलर्ट
बुद्धिबळपटावर हिंदुस्थानचा विश्वविजय, अंतिम फेरीत हिंदुस्थानच्या कोनेरू हम्पी आणि दिव्या देशमुख भिडणार
क्रिकेटवारी – ऋषभ, तुझे सलाम!
हिंदुस्थानच्या ‘कसोटी’नंतर इंग्लंडचे ‘बॅझबॉल’ , पहिल्या डावात हिंदुस्थानच्या 358 धावा; इंग्लंडच्या सलामीवीरांची आक्रमक शतकी खेळी
मराठी बोलतो, असे सांगणाऱया विद्यार्थ्यावर हॉकी स्टिकने हल्ला, वाशीतील आयसीएल कॉलेजच्या गेटवर घडला संतापजनक प्रकार