संजू सॅमसन ठरला सर्वात महागडा खेळाडू, आता या लीगमध्ये धमाका करणार!

संजू सॅमसन ठरला सर्वात महागडा खेळाडू, आता या लीगमध्ये धमाका करणार!

राजस्थान रॉयल्स (RR) संघाचा कर्णधार संजू सॅमसन आता मोठा धमाका करण्यासाठी सज्ज झाला आहे. IPL मध्ये त्याचा खेळ सुमार राहिला होता. तसेच दुखापतीमुळे तो संपूर्ण हंगामात फक्त 9 सामने खेळला होता. ज्यामध्ये त्याने 285 धावा केल्या होत्या. परंतु आता संजू केरल क्रिकेट लीग (KCL 2025) मध्ये तोडफोड फटकेबाजी करण्यासाठी सज्ज झाला आहे. तो KCL च्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे.

केरळ क्रिकेट लीगची तिरुवनंतपुरम येथे लिलाव प्रक्रिया पार पडली. या लिलाव प्रक्रियेत संजू सॅमसनला कोच्ची ब्लू टायगर्स या संघाने 26.80 लाख रुपयांची सर्वाधिक बोली लावली. KCL च्या इतिहासातील ही सर्वात मोठी बोली ठरली आहे. त्यामुळे संजू सॅमसन KCL च्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. लिलाव प्रक्रियेमध्ये संजू सॅमसनची मुळ किंमत 5 लाख रुपये होती. तसेच प्रत्येक संघाच्या पर्समध्ये 50-50 लाख रुपये होते. म्हणजेच एका संघाच्या पर्सची अर्धी रक्कम संजू सॅमसनच्या नावावर झाली आहे. मागील हंगामात संजू सॅमसन केसीएलमध्ये खेळला नव्हता. परंतु यंदा आपल्या फलंदाजीचे जलवे दाखवण्याचा त्याचा प्रयत्न राहिलं. 21 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर दरम्यान केसीएलचा थरार रंगणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

निवृत्त होऊन आठ महिने झाले तरी माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा मुक्काम सरकारी बंगल्यात, प्रशासनाची केंद्राकडे धाव निवृत्त होऊन आठ महिने झाले तरी माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा मुक्काम सरकारी बंगल्यात, प्रशासनाची केंद्राकडे धाव
माजी सरन्यायाधीस डॉ. डी. वाय चंद्रचूड यांचा पदाचा कार्यकाळ संपला आहे. तरी त्यांनी आपले अधिकृत निवासस्थान रिकामे केलेले नाही. या...
ती नकली दाढी अमित शहा कधी कातरतील कळणारही नाही, संजय राऊत यांचा जबरदस्त टोला
मिस्टर फडणवीस, ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने तुमची रुदाली सुरू – संजय राऊत
नितीश कुमार आणि भाजपने बिहारला गुन्ह्यांची राजधानी बनवली, राहुल गांधी यांची टीका
Photo – गोड तुझे रूप, गोड तुझे नाम!
महासागर उसळला… अफाट, अभूतपूर्व आणि अविस्मरणीय!
हिंदी सक्तीसाठी छत्रपतींचा अपमान… सत्ताधाऱ्यांना लाज वाटली पाहिजे, संजय गायकवाडांच्या वक्तव्यावरून विजय वडेट्टीवार भडकले