वैभव सूर्यवंशीने इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई केली; 52 चेंडूंमध्येच ठोकलं शतक

वैभव सूर्यवंशीने इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई केली; 52 चेंडूंमध्येच ठोकलं शतक

वैभव सूर्यवंशीने आपली तोडफोड फटकेबाजी कायम ठेवली आहे. IPL मद्ये धुमशान घातल्यानंतर वैभव आता इंग्लंडमध्ये इंग्लंडच्याच गोलंदाजांची शाळा घेताना दिसत आहे. टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्या 19 वर्षांखालील संघामध्ये सध्या पाच सामन्यांची वनडे मालिका सुरू आहे. या मालिकेतील चौथ्या सामन्यात वैभवच वादळ गोंगावलं आणि त्याने 52 चेंडूंमध्येच शतक ठोकलं.

टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये शनिवारी (5 जुलै 2025) वॉर्सेस्टर येथे सामना सुरू आहे. इंग्लंडने नाणेफेक जिंकून टीम इंडियाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. टीम इंडियाला पहिला धक्का 14 या धावसंख्येवर कर्णधार आयुष म्हात्रेच्या स्वरुपात बसला. परंतु त्यानंतर वैभव सूर्यवंशी आणि विहान मल्होत्रा यांनी चौफेर फटकेबाजी करत टीम इंडियाला 200 च्या पार नेलं. वैभव सूर्यवंशीने 78 चेंडूंमध्येच 10 षटकार आणि 13 चौकार मारत 143 धावा चोपून काढल्या. तसेच विहान मल्होत्राने 121 चेंडूंमध्ये 15 चौकार आणि 3 षटकार मारत 129 धावांची खेळी केली. या दोघांनी केलेल्या दमदार फटकेबाजीमुळे टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना 9 गड्यांच्या मोबदल्यात 363 धावांचा डोंगर इंग्लंडसमोर उभा केला आहे. वैभव सूर्यवंशी अंडर-19 वनेडमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा हिंदुस्थानी खेळाडू आहे. या मालिकेत वैभवची फलंदाजी आतापर्यंत दमदार राहिली आहे. त्याने पहिल्या सामन्यात 48, दुसऱ्या सामन्यात 45, तिसऱ्या सामन्यात 86 आणि चौथ्या सामन्यात 143 धावा केल्या आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Photo – गोड तुझे रूप, गोड तुझे नाम! Photo – गोड तुझे रूप, गोड तुझे नाम!
‘अवघे गर्जे पंढरपूर चालला नामाचा गजर’ या संत उक्तीप्रमाणे अवघी पंढरी नगरी राज्याच्या कानाकोपऱ्यातून, परराज्यातून आलेल्या 15 लाखांवर वारकरी भाविकांनी...
महासागर उसळला… अफाट, अभूतपूर्व आणि अविस्मरणीय!
हिंदी सक्तीसाठी छत्रपतींचा अपमान… सत्ताधाऱ्यांना लाज वाटली पाहिजे, संजय गायकवाडांच्या वक्तव्यावरून विजय वडेट्टीवार भडकले
मुंबई आमच्या हक्काची… आवाज मराठीचा
मिंधे आमदाराची जीभ घसरली, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलताना केली गंभीर चूक
साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 6 जुलै ते शनिवार 12 जुलै 2025
रोखठोक – मराठी एकजुटीचा विजय असो!