मुख्यमंत्र्यांचे त्यांच्या पक्षातील नेते ऐकत नाही…महायुतीकडून शिवसेनेला घरचा आहेर

मुख्यमंत्र्यांचे त्यांच्या पक्षातील नेते ऐकत नाही…महायुतीकडून शिवसेनेला घरचा आहेर

ठाणे | 20 मार्च 2024 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विजय शिवतारे यांची समजूत काढली. त्यानंतरही विजय शिवतारे बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये फिरून महायुतीचे वातावरण खराब करत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेचे मुख्य नेते आहेत. त्यांचे आपल्या नेत्यांवर नियंत्रण नाहीत, असे चित्र जात आहे. त्यांच्याच पक्षाचे नेते त्यांचे ऐकत नाहीत, असा घरचा आहेर महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आनंद परांजपे यांनी केले. शिवतारे अजित दादांबद्दल बारामतीत महायुतीचा धर्म तोडत राहिले तर महायुतीमध्ये शिवसेना देखील ज्या लोकसभेच्या जागा लढणार आहेत, तिथे महायुतीचा पाळणार नाही, असा इशारा आनंद परांजपे यांनी दिला.

महायुतीचा धर्म पाळावा

आम्हाला महायुतीचे वातावरण खराब होईल, असे कृत्य करायचे नाही. परंतु सातत्याने विजय शिवतरे हे कृत्य करत आहेत. संपूर्ण महाराष्ट्रमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे त्यांच्या पक्षातील नेते ऐकत नाही, असे मेसेज जात आहे. आम्ही 48 लोकसभा मतदारसंघांमध्ये महायुतीचा धर्म पाळत आहे. शिवसेनेकडून राष्ट्रवादीचे शक्ती स्थळ राष्ट्रवादीचा स्वाभिमान असणाऱ्या बारामतीमध्ये महायुतीचं वातावरण खराब करण्याचं काम सुरु आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा बारामतीमध्ये प्रचार सुरू आहे. चंद्रकांत पाटील यांनी देखील समन्वय रहावा म्हणून बैठका घेतल्या. परंतु शिवतारे हा महायुतीच्या दुधात मीठाचा खडा टाकत आहे. पुरंदरच्या जनतेने त्यांना त्यांची जागा २०१९ मध्ये दाखवली होती. अजित दादांच्या उमेदवाराचा सर्वाधिक मतांनी विजय झाला होता.

कल्याणमध्ये महायुतीचा प्रचार

कल्याण मतदार संघात आपल्या पक्षाचा उमेदवार आपल्या पक्षाचे चिन्ह उभ रहावे त्याची भावना असणं स्वाभाविक आहे. कल्याण मतदारसंघांमध्ये तीन आमदार भारतीय जनता पक्षाचे आहेत, त्यामुळे त्यांनी ठिकाणी असणारे भाजपचे लोकांनी त्यांची भावना त्यांच्या वरिष्ठांकडे मांडली आहे. याच्यामध्ये गैर नाही, असे आनंद पराजंपे यांनी यांनी सांगितले. मात्र महायुतीचे नेते जो निर्णय देतील त्याला विजय करण्याकरिता आपण प्रयत्न करू, हे त्यांनी स्पष्ट केले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;