एकच आमदार असलेल्या पक्षासाठी भाजपच्या…रोहित पवार यांचे एका दगडात दोन पक्षी

एकच आमदार असलेल्या पक्षासाठी भाजपच्या…रोहित पवार यांचे एका दगडात दोन पक्षी

पुणे | 21 मार्च 2024 : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु होताच युती अन् आघाड्यांना वेग आला आहे. महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात जागा वाटपाची बोलणी अंतिम टप्प्यात आली आहे. त्याचवेळी महायुतीत नवीन पक्ष दाखल होण्याची चर्चा सुरु आहे. राज ठाकरे यांचा मनसे महायुतीत येत आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी खोचक ट्विट केले आहे. महाराष्ट्रात मनसेसोबत अन् तामिळनाडूत भाजपने सहा पक्षांसोबत युती केली असल्यामुळे रोहित पवार यांनी टीका केली आहे.

काय आहे रोहित पवार यांचे ट्विट

आज देशभरात भाजपसाठी असलेली प्रतिकूल परिस्थिती बघता पराभवाच्या भीतीपोटी भाजपा आता छोटे छोटे मित्रपक्ष जोडत आहे. एकीकडे ४०-४० आमदार असलेल्या फुटीर गटांना जागावाटपाच्या वाटाघाटी करताना हवं ते मिळत नाही तर दुसरीकडे १-१ आमदार असलेल्या छोट्या पक्षांना मात्र भाजप पायघड्या अंथरतोय, असा टोला राज ठाकरे आणि अमित शहा यांच्या भेटीवरून रोहित पवार यांचा भाजपसह अजित पवार यांना टोला लगावला.

ट्विटमध्ये रोहित पवार यांनी म्हटले आहे की, असला शाही पाहुणचार बघून छोटे पक्ष मनातले मांडे खात असले तरी ‘उपयुक्तता असेपर्यंत वापरायचे आणि नंतर पूर्णतः संपवून आपले गुलाम बनवून फेकायचे’ या भाजपच्या मूळ स्वभावापासून मात्र ते अनभिज्ञ दिसतात. या छोट्या पक्षांकडे बघून अल्पावधीतच आधीच शिकार झालेले मोठे पक्ष “नया_है_वह” असेच म्हणत असतील!

रोहित पवार महायुतीमधील एकाही पक्षावर सोडत नाही. अनेक वेळा त्यांनी अजित पवार यांच्यावर कठोर टीका केली आहे. परंतु आता भाजप आणि मनसे युतीवरुन राज ठाकरे यांना घेरले आहे. यापूर्वी राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीत यावे, अशी ऑफर रोहित पवार यांनी राज ठाकरे यांना  दिली होती.

हे ही वाचा

शरद पवार, अजित पवार वादावर शरद पवार यांच्या बहिणीचे वक्तव्य, कोणाची घेतली बाजू

 

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;