कुठल्या पक्षात जाणार की अपक्ष लढणार?; वसंत मोरे यांच्या फेसबुक पोस्टने सस्पेन्स वाढला

कुठल्या पक्षात जाणार की अपक्ष लढणार?; वसंत मोरे यांच्या फेसबुक पोस्टने सस्पेन्स वाढला

अभिजीत पोते, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, पुणे | 21 मार्च 2024 : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. अशात पुण्यात विविध घडामोडी घडत आहेत. मनसेला राम राम केल्यानंतर वसंत मोरे यांची राजकीय भूमिका काय असेल? याची उत्सुकता कायम आहे. अशात वसंत मोरे यांनी फेसबुर पोस्ट शेअर केल्यानंतर हा सस्पेन्स आणखी वाढला आहे. रात्री उशिरा शेअर केलेल्या फेसबुक पोस्टने चर्चांना उधाण आलं आहे. एक व्हीडिओ शेअर करत वसंत मोरे यांनी आपल्या भावना मांडल्या आहेत. त्यामुळे सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे.

वसंत मोरे यांची फेसबुक पोस्ट चर्चेत

तरी पण निवडणूक एकतर्फी कशी होते बघोतच मी… असा मजकूर असलेली एक पोस्ट वसंत मोरे यांनी काल रात्री उशिरा फेसबुकवर केली. या पोस्टमध्ये वसंत मोरे यांनी एक व्हीडिओ शेअर केलाय. या व्हीडिओला असणारं बॅगराऊंड म्युझिक बरंच काही सुचवू पाहात आहे. देखीये जी ये शहर है तुम्हारा लेकीन इस शहर में दबदबा है हमारा…, असं बॅगराऊड असणारा व्हीडिओ आणि पोस्ट सध्या प्रचंड चर्चेत आहे.

निवडणूक लढण्यावर ठाम

वसंत मोरे यांनी विविध पक्षातील बड्या नेत्यांची भेट घेतली आहे. या भेटींनंतरही लोकसभा निवडणूक लढवण्यावर वसंत मोरे ठाम आहेत. त्यामुळे वसंत मोरे नेमके कुठल्या पक्षात प्रवेश करतात का? की अपक्ष उमेदवार म्हणून लोकसभा निवडणूक लढतात? हे अद्याप अस्पष्ट आहे. मात्र लवकरच भूमिका स्पष्ट करेल अशी माहिती वसंत मोरे यांनी टीव्ही 9 मराठीला दिली आहे.

कोणत्या पक्षात जाणार?

12 मार्चला वसंत मोरे यांनी मनसे पक्षाला राम राम केला. त्यानंतर त्यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली. आपल्याबाबत आणि पुणे लोकसभा मतदारसंघाबाबत पुण्यातील कोअर कमिटीने राज ठाकरेंना दिला. पुण्यातील कोअर कमिटी मनसे पक्षाला संपवण्याचं काम करतेय. असे गंभीर आरोप त्यांनी लावले. त्यानंतर वसंत मोरे कोणत्या पक्षात राणाज याची चर्चा होतेय. राष्ट्रवादी शरद पवार गट किंवा शिवसेना ठाकरे गटात वसंत मोरे जातील, अशी चर्चा होतेय. त्यामुळे वसंत मोरे येत्या काळात कोणत्या पक्षात प्रवेश करतात हे पाहणं महवाचं असेल.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;