पक्षप्रवेश ही माझ्यासाठी दुय्यम गोष्ट, महायुतीचाच उमेदवार मीच!; बड्या नेत्याने दंड थोपटले

पक्षप्रवेश ही माझ्यासाठी दुय्यम गोष्ट, महायुतीचाच उमेदवार मीच!; बड्या नेत्याने दंड थोपटले

मंचर, पुणे | 20 मार्च 2024 : लोकसभा निवडणूक आता जवळ आली आहे. कोणत्या मतदारसंघात कोण उमेदवार असणार? याची चर्चा होतेय. अशातच एका वरिष्ठ नेत्याने आपणच महायुतीचे उमेदवार असल्याचं जाहीर केलं आहे. गेल्या दीड वर्षापासून मी प्रचाराला सुरुवात केली आहेय तेव्हापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं की, लोकसभेसाठी कामाला लागा… त्यामुळे पक्षप्रवेश ही गोष्ट माझ्यासाठी दुय्यम गोष्ट आहे. मीच महायुतीचा उमेदवार आहे, असं शिवसेनेचे वरिष्ठ नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी म्हटलं आहे. पुणे जिल्ह्यातील मंचरमध्ये ते माध्यमांशी बोलत होते.

राष्ट्रवादीचा दावा योग्यच- पाटील

शिरूरच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दावा केला तो रास्त आहे. त्यांचे चार आमदार मतदारसंघात आहेत. शिवसेनेचा एकही आमदार शिरूर लोकसभा मतदारसंघात नसून राष्ट्रवादीने केलेला दावा योग्य आहे. मात्र तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला आशा सोडू नका, असं सांगितलं असल्याचं आढळराव पाटील म्हणाले.

“तेव्हाच पक्षप्रवेश झाला असता, पण…”

अजित पवार आणि दिलीप वळसे पाटील यांच्यासोबत प्राथमिक चर्चा झाली होती. वर्षा बंगल्यावर अजित पवार , सुनिल तटकरे, दिलीप वळसे पाटील यांनी एकनाथ शिंदे यांना शिरूरचे जागा आमची आहे. आढळराव पाटील यांना आमच्याकडे उमेदवार म्हणून द्या अशी मागणी केली. मात्र मुख्यमंत्र्यांनी मला शेवटचा प्रयोग करु द्या असं सांगितलं. मंचरलाच अजित पवार यांच्या चार तारखेच्या सभेत माझा प्रवेश होणार होता, असं आढळराव पाटील म्हणाले.

सगळ्यांची एकत्रित नाव जाहीर करू. त्यावेळी माझं नाव जाहीर करण्यात येणार आहे. मी राष्ट्रवादीत जाणार यापेक्षा मी महायुतीचा महायुतीचा उमेदवार असणार आहे. नाराज असताना कोण काय बोललं यापेक्षा आता तिन्ही पक्ष एकत्र आहे. त्यामुळे पाठीमागचं विसरायचं असतं. पक्षप्रवेश ही दुय्यम गोष्ट मी महायुतीचाच उमेदवार आहे, असं आढळराव पाटलांनी जाहीर केलं.

“मीच उमेदवार!”

महाविकास आघाडीमधून महायुतीमध्ये प्रवेश केला याला पक्षप्रवेश म्हणतात मात्र मी महायुतीचाच उमेदवार आहे. महायुतीत असल्यामुळे माझा पक्षप्रवेश होईल असं म्हणण्यापेक्षा उमेदवार अदला बदली म्हणता येईल. दोन्ही पक्षाला वाटलं की पक्ष प्रवेश करणे गरजेचे आहे तर तसं जाहीर होईल. मतदार संघ, नावे दोन दिवसात जाहीर होण्यापेक्षा शिरूर लोकसभा मतदारसंघातून मी उमेदवार आहे हे महत्त्वाचं आहे, असं शिवाजीराव आढळराव पाटील यांनी जाहीर केलं.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;