मविआकडून उमेदवारी मिळावी म्हणून प्रफुल्ल कदम यांचा विठ्ठलाला दुग्धाभिषेक; म्हणाले, मीच खरा…

मविआकडून उमेदवारी मिळावी म्हणून प्रफुल्ल कदम यांचा विठ्ठलाला दुग्धाभिषेक; म्हणाले, मीच खरा…

पंढरपूर | 21 मार्च 2024 : लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं गेलं आहे. राजकीय पक्षांकडून उमेदवारांची नावं जाहीर केली जात आहेत. महाविकास आघाडीची यादी अद्याप जाहीर झालेली नाही. त्यामुळे कोणत्या मतदारसंघातून कुणाला उमेदवारी मिळणार याचा अद्याप सस्पेन्स कायम आहे. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अनेक तरूणांना आपल्याला संधी मिळावी, असं वाटतंय. किसान आणि वॉटर आर्मीचे अध्यक्ष प्रफुल्ल कदम यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी, म्हणून महाविकास आघाडीकडे मागणी केली आहे. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिर परिसरात त्यांनी विठ्ठलाच्या मूर्तीला दुग्धाभिषेक घातला आहे. उमेदवारी का देण्यात यावी?, याचं कारणही प्रफुल्ल कदम यांनी सांगितलं आहे.

विठ्ठलाच्या मूर्तीला दुग्धाभिषेक

किसान आणि वॉटर आर्मीचे अध्यक्ष प्रफुल्ल कदम यांनी दुग्धाभिषेक विठ्ठलाला घातला आहे. माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी म्हणून त्यांनी महाविकास आघाडीकडे मागणी केली आहे. शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या प्रश्नासाठी लढा देत यावा, यासाठी उमेदवारीची मागणी त्यांनी केली आहे.

प्रफुल्ल कदम काय म्हणाले?

गेली 25 वर्ष स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्या विचारांवर मी चालतो आहे. गणपतराव देशमुख यांच्या विचारांचा खरा वारसदार मीच आहे. त्याच विचाराने शेतकरी आणि कष्टकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी काम करतो आहे. विठ्ठल हे गोरगरीब कष्टकरी आणि शेतकऱ्यांचं दैवत आहे. त्यामुळे मी विठ्ठलाकडे साकडं घालतोय की, या मतदारसंघातील लोकांची सेवा करण्यासाठी, त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मला उमेदवारी देण्यात यावी, असं प्रफुल्ल कदम यावेळी म्हणाले.

“…म्हणून उमेदवारी द्या”

मागची कित्येक वर्षे मी लोकांच्या प्रश्नांसाठी लढतो आहे. तरूणांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी काम करतो आहे. पण एखादं संविधानिक पद तुमच्याकडे असेल तर तुम्ही तरूणांना शेतकऱ्यांना न्याय देऊ शकता. त्यामुळे मला उमेदवारी देण्यात यावी. तरूणांचा, शेतकऱ्यांचा आणि सामान्य माणसाचा मला पाठिंबा आहे. महाविकास आघाडीने मला उमेदवारी दिली तर निश्चितपणे मी विजयी होईल, असं प्रफुल्ल कदम यांनी म्हटलं.

उमेदवारी नक्की कुणाला दिली जाणार?

माढा लोकसभा मतदारसंघातून शरद पवार हे निवडणूक लढवतील अशी चर्चा आहे. शिवाय रासपचे नेते महादेव जानकर हे देखील महाविकास आघाडीकडून निवडणूक लढण्यासाठी इच्छूक आहेत. तशी मागणी त्यांनी शरद पवार यांच्याकडे केली आहे. आता प्रफुल्ल कदम यांनी देखील माढ्यातून उमेदवारीची मागणी केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी कुणाला उमेदवारी देणार? हे पाहणं महत्वाचं असेल.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;