विजय शिवतारे आक्रमक, अजितदादा बॅकफूटवर?; म्हणाले, शेवटी…

विजय शिवतारे आक्रमक, अजितदादा बॅकफूटवर?; म्हणाले, शेवटी…

पुणे | 20 मार्च 2024 : बारामती मतदारसंघाच्या उमेदवारीवरून शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे चांगलेच आक्रमक झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवतारे यांना दोनदा समजावून सांगितले तरी शिवतारे हे काही बारामतीतून माघार घ्यायला तयार नाहीत. अजितदादांनी माझी औकात काढली होती. आता बारामतीची जनता माझ्या पाठी आहे. जनता जो निर्णय घेईल तेच मी करेल, असं विजय शिवतारे यांनी म्हटलं आहे. शिवतारे यांनी मैदानात दंड थोपटून उभं राहण्याचं ठरवल्याने नेहमी आक्रमक असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार बॅकफूटवर गेले आहेत. अजित पवार यांनी शिवतारे यांच्या भूमिकेवर अत्यंत सावध भूमिका घेतली आहे.

अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार या बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. सुनेत्रा पवार यांनी प्रचारही सुरू केला आहे. त्यांच्या विरोधात सुप्रिया सुळे उभ्या आहेत. त्यामुळे पवार घरातच काँटे की टक्कर पाहायला मिळणार आहे. त्यातच विजय शिवतारे यांनी बारामतीच्या रणसंग्रामात उडी घेतल्याने सुनेत्रा पवार यांना त्याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळेच अजितदादा बॅकफूटवर आले आहेत. त्यांनी अत्यंत सावध प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.

मनात आलं, दिली प्रतिक्रिया

अजितदादा खडकवासल्यात महायुतीच्या बैठकीला आले होते. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विजय शिवतारे यांचे नेते आहेत. त्यामुळे शेवटी आपल्या नेत्याचं ऐकायचं की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, असं सांगतानाच शिवतारे यांच्या मनात आलं त्यांनी टीका केली. लोकशाहीत प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे, अशी सावध प्रतिक्रिया अजितदादांनी दिली आहे.

आम्हीही आरेला…

शिवतारे यांचा फटका बसेल याबाबत मला आता सांगता येणार नाही. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवतारेंना आवाहन केलंय. आता शिवतारेंनी नेतृत्वाचे ऐकायचे की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मात्र आम्हाला वातावरण खराब करायचे नाही. आम्हीही आरेला कारे करू शकतो. मात्र वातावरण खराब न करता निवडणूकीला सामोरे जायचे आहे, अशा शब्दात अजितदादांनी शिवतारे यांना सुनावले.

पार्थ गनिमी काव्याने…

पार्थ पवार हे बारामतीच्या प्रचारात दिसत नाहीत. त्याबाबतही त्यांना विचारण्यात आलं. त्यावर अजितदादांनी मिश्किल प्रतिक्रिया दिली. पार्थ पवार हे गुप्त पद्धतीने प्रचार करत आहेत. गनिमी काव्याने प्रचार करत आहेत, असं मिश्किल उत्तर अजितदादांनी दिलं.

दिल्ली म्हणजे पाकिस्तान नाही

अजित पवार यांना पूर्वी राष्ट्रवादीत स्वत: निर्णय घेण्याचे अधिकार होते. आता त्यांना दिल्लीवारी करावी लागते, अशी टीका खासदार अमोल कोल्हे यांनी केली होती. कोल्हे यांच्या या टीकेवर अजितदादांनी पलटवार केला आहे. दिल्ली म्हणजे काय पाकिस्तान नाही ना? यांना दिल्लीवारी करावी लागत नाही काय?, असा सवाल अजितदादांनी केला. यावेळी अजितदादांनी अमोल कोल्हे यांना राजीनाम्याची आठवणही करून दिली. मीच कोल्हेंना पक्षात आणलं आणि निवडूनही आणलं. ठिक आहे, दिवस बोलतात, असं म्हणत अजितदादांनी सूचक इशाराही दिला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;