पुणे, शिरुर, बारामतीनंतर मावळमध्ये कोण उमेदवार? सस्पेन्स वाढला

पुणे, शिरुर, बारामतीनंतर मावळमध्ये कोण उमेदवार? सस्पेन्स वाढला

पुणे | 21 मार्च 2024 : पुणे जिल्ह्यातील मावळ, पुणे, शिरूर आणि बारामती चार मतदार संघ आहे. यामध्ये पुणे, शिरुर, बारामतीमध्ये उमेदवार जवळपास निश्चित झाले आहेत. परंतु मावळ लोकसभा मतदार संघात महायुती अन् महाविकास आघाडीला अजूनही उमेदवार मिळत नाही. लोकसभेचा मावळ मतदारसंघ महायुतीतील शिवसेना भाजपला की राष्ट्रवादीला जाणार याबाबत अद्यापही अंतिम निर्णय झालेला नाही. यामुळे मावळ लोकसभा मतदारसंघात उमेदवारांचा जीव टांगणीला लागला आहे.

बैठकांचे सत्र, निर्णय प्रलंबित

मावळ शिवसेनेच्या जागेवर भाजप आणि राष्ट्रवादीचा दावा कायम आहे. यावर विषयावर बैठका सुरू आहेत. परंतु इच्छुकांचा जीव टांगणीला लागलेला आहे. घाटाखाली भाजप राष्ट्रवादीची संदिग्ध भूमिका आहे. मावळ पिंपरी चिंचवड या तीन विधानसभा मतदारसंघातील भाजप आणि राष्ट्रवादीच्या गटाने मागणी केली असती तरी घाटाखाली भाजप आणि राष्ट्रवादीच्या गटाची भूमिका अद्यापही स्पष्ट नाही. घाटाखालील नेते याबाबत बोलत नसल्याचे दिसून येत आहे.

मावळ शिवसेनेची जागा

मावळमध्ये शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे आहेत. महायुतीच्या जागा वाटपात ही जागा शिवसेनेला जाणार असल्याचा दावा केला जात आहे. मात्र गेल्या महिन्यापासून या मतदारसंघावर भाजप आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटांनी दावा केला आहे. यासंदर्भात भाजप आणि राष्ट्रवादीतील स्थानिक नेत्यांच्या अनेक बैठका सुरू आहेत. त्यामुळे अद्याप मावळ लोकसभेची उमेदवारी कुणाला यांचा तिढा कायम आहे.

मावळमध्ये अजून रंगत नाही

बारामतीमध्ये सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांनी प्रचार सुरु केला आहे. पुणे मतदार संघात मुरलीधर मोहोळ यांचा प्रचार सुरु झाला आहे. काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर यांचे नाव पुढे आले आहे. शिरुरमध्ये विद्यामान खासदार अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजी आढळराव पाटील यांची उमेदवारी नक्की झाली आहे. यामुळे या तीन लोकसभा संघात उमेदवारांचा प्रचार सुरु झाला आहे. परंतु मावळमध्ये अजून रंगत नाही.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;