Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींची लॉटरी लागणार? योजनेबाबत मोठ्या निर्णयाची शक्यता
ज्या कुटुंबाचं उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत दर महिन्याला लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये दीड हजार रुपये जमा करण्यात येतात. मात्र मे महिना संपला तरी अजूनही लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये मे महिन्याचे पैसे जमा झालेले नाहीयेत, तसेच त्याबाबत कोणती घोषणा देखील झालेली नाहीये, मे महिन्याचा हाफ्ता बँक खात्यामध्ये कधी जमा होणार? याकडे आता लाडक्या बहिणींचं लक्ष लागलं आहे. दरम्यान मे आणि जून दोन्ही महिन्यांचे पैसे एकत्रच मिळणार असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.
दहा जूनला वटपौर्णिमा आहे, वटपौर्णिमा हा सण महिलांसाठी महत्त्वाचा असतो. त्यामुळे वटपौर्णिमेच्या मुहूर्तावर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये मे महिन्याचे दीड हजार आणि जून महिन्याचे दीड हजार असे तीन हजार रुपये जमा केले जाऊ शकतात अशी चर्चा आता सुरू झाली आहे. मात्र या संदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाहीये, त्यामुळे मे चा हाफ्ता कधी जमा होणार याबाबत अजून कोणतीही माहिती समोर आलेली नाहीये.
दरम्यान विधानसभा निवडणुकीवेळी राज्यात पुन्हा आमची सत्ता आली तर आम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेंतर्गत मिळणाऱ्या हाफ्त्यामध्ये वाढ करू, रक्कम 1500 वरून 2100 रुपये करू असं अश्वासन महायुतीच्या नेत्यांकडून देण्यात आलं होतं. महायुतीला राज्यात स्पष्ट बहुमत मिळालं, मात्र अजूनही याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाहीये, राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर याबाबत निर्णय घेतला जाईल, असं अश्वासन या संदर्भात काही दिवसांपूर्वी अर्थमंत्री अजित पवार यांनी दिलं आहे. त्यामुळे 2100 रुपये कधी मिळणार ? याकडे सर्व राज्याचंं लक्ष लागलं आहे.
त्या लाडक्या बहिणींना योजनेतून वगळलं
दरम्यान अर्ज छाणणीदरम्यान ज्या महिला सरकारी कर्मचारी आहेत, त्यांनी देखील या योजनेचा लाभ घेतल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळे आता अशा महिलांची नावं या योजनेतून वगळण्यात आली आहेत. तसेच ज्या महिला या योजनेच्या अटींमध्ये बसत नाहीत, अशा महिलांची नावं देखील काही दिवसांपूर्वी वगळण्यात आली होती.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List