‘मला आशा आहे की त्यांना वाईट वाटणार नाही’, शिंदे आणि अजितदादांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असे का म्हणाले?

‘मला आशा आहे की त्यांना वाईट वाटणार नाही’, शिंदे आणि अजितदादांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असे का म्हणाले?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत राहतात. विकासाचा मुद्दा असो की विरोधी पक्षावर निशाणा साधणे असो फडणवीस खास शैलीत समाचार घेतात. गेल्या 35 महिन्यात त्यांनी भारतीय जनता पक्षाला भक्कम करण्यात आणि त्यांच्या मागील कार्यकाळातील विकास योजनांवर लक्ष्य केंद्रीत केले आहे. एका वृत्तपत्राच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी अनेक मुद्यांवर थेट भाष्य केले. त्यांच्या वक्तव्याची आता राज्यात चर्चा सुरू आहे.

लव जिहाद आडून शोषण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लव जिहादवर भाष्य केले. या शब्दावर नेहमी वाद होतो. पण काही जिल्ह्यात प्रेम संबंधाच्या आडून शोषण करण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला. अनेक जिल्ह्यात लव जिहाद ही वास्तविकता आहे. जेव्हा लव जिहादची गोष्ट समोर येते. तेव्हा तुम्हाला वाटतं की ही अतिशयोक्ती आहे. पण काही जिल्ह्यात या घटना घडतात, हे सत्य आहे, असे फडणवीस म्हणाले.

अर्थात प्रत्येक प्रकरणात चिंता व्हावी असे नाही. पण काही पॅटर्न मात्र चिंता निर्माण करणारे आहेत. मी आंतरजातीय विवाह अथवा आंतरधर्मीय लग्नाच्या विरोधात नाही. पण फसवणूक करून मुलीशी लग्न करून तिचे शोषण करण्यात येतो, तेव्हा हा विषय गंभीर होतो, असे फडणवीस म्हणाले. या संदर्भात ज्याविषयी सत्यता समोर आली, ठोस पुरावे हाती आले. त्यावेळी आपण त्यावर बोललो असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

मला वाटतं त्यांना वाईट वाटणार नाही

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या सहकार्यांविषयी प्रश्न करण्यात आला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासोबत ते सरकारचा गाडा हाकत आहेत. त्यांच्याविषयी फडणवीस यांना प्रश्न करण्यात आला. अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांच्या पैकी कोण चांगल्याप्रकारे व्यक्त होते, संवाद साधते अशी गुगली त्यांना टाकण्यात आली. त्यावेळी त्यांनी साधेपणाने सांगितले की दोघे पण संवाद साधण्यात चांगले नाहीत. मला अपेक्षा आहे की त्यांना माझ्या बोलण्याचे वाईट वाटणार नाही.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;