‘राऊत यांच्या स्वप्नात दिघे येणे शक्यच नाही, माझ्याच स्वप्नात…,’ काय म्हणाले नरेश म्हस्के

‘राऊत यांच्या स्वप्नात दिघे येणे शक्यच नाही, माझ्याच स्वप्नात…,’ काय म्हणाले नरेश म्हस्के

आपण महापौर असताना ठाणे महापालिकेने कोरोना काळात ३५० रुपयांनी बॉडीबॅगची खरेदी केली मात्र त्याच कंपनीची बॉडीबॅग मुंबई महापालिकेने ७००० रुपयांना खरेदी केली. खिचडी घोटाळ्यात सूरज चव्हाण जेलमध्ये गेला. तो कोणाचा मित्र आहे ? पत्राचाळ घोटाळ्यात संजय राऊत जेलमध्ये गेले. त्यामुळे भ्रष्टाचार करणाऱ्यांना शिंदे यांच्यावर बोलण्याचा आणि टीका करण्याचा काहीही नैतिक अधिकार नाही, अशी खरमरीत टीका शिवसेनेचे खासदार नरेंद्र म्हस्के यांनी केली आहे.

महाविकास आघाडी सरकार असताना मुंबईच्या नियोजन बैठकीत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना डावलले गेले होते. यासंदर्भात आपण संजय राऊत यांना तक्रार केली असता मुंबई महापालिका हा विषय ठाकरे फॅमिलीचा आहे, सर्व निर्णय ठाकरे फॅमिली आणि मित्र परिवार घेणार, एकनाथ शिंदेंना सांग मुंबई महापालिकेत लक्ष घालू नका, हा माझा निरोप दे,असेही संजय राऊत यांनी मला सांगितल्याचा दावा खासदार म्हस्के यांनी यावेळी केला.

खासदार म्हस्के म्हणाले की, संजय राऊत यांनी धर्मवीर आनंद दिघे यांचा कायम द्वेष केला. राऊत यांच्या मुलाखतीमुळेच आनंद दिघे यांना टाडा लागला. त्यामुळे राऊत यांच्या स्वप्नात धर्मवीर आनंद दिघे जाणे कधीच शक्य नाही, असे खासदार म्हस्के म्हणाले. या उलट हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे आपल्या स्वप्नात आले होते, असे खासदार म्हस्के म्हणाले. बाळासाहेबांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुसळधार पावसातही मुंबई आणि ठाण्यात केलेल्या कामाचे कौतुक केले, असे खासदार म्हस्के म्हणाले.

एकनाथ शिंदे भरपावसात धावपळ करत आहेत मात्र माझ्याच जिवावर मोठे झालेले, खासदारकी मिळवणारे, इतकी वर्ष मुंबई महापालिकेची सत्ता उपभोगणारे घरकोंबड्यासारखे घरात बसलेत. समाजकारणाचे मी दिलेल्या तत्वाचे पालन करत नाहीत, हे माझे शिष्य होते याची मला लाज वाटते, याउलट एकनाथ शिंदे यांचा गर्व वाटतो, असे उद्गार बाळासाहेबांनी काढले. पाकिस्तानची भाषा संजय राऊत बोलतोय, पाकिस्तानची बाजू घेतोय मी जर असतो तर ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मी स्वत: मुंबईत बोलावून सत्कार केला असता. आपली लोकं पाकिस्तानची भाषा बोलतात त्यांना हिंदुस्थानच्या जनतेने जोड्याने हाणले पाहिजे, अशी वक्तव्यं बाळासाहेबांनी स्वप्नात येऊन केली, असे खासदार म्हस्के म्हणाले.

एनडीए नेतृत्वाने मान दिला

महाविकास आघाडी सरकारच्या काळात उबाठाला दिल्लीत सोनिया गांधी आणि राहुल गांधी घराबाहेर ताटकळत ठेवायचे. तेव्हा ते कोणाचे लांगुलचालन करायचे सर्वांनी बघितले आहे. याउलट नुकताच केंद्रात झालेल्या एनडीएच्या घटक पक्षांच्या बैठकीत ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लष्कराचे अभिनंदन करण्याचा ठराव उपमख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्याचा मान एनडीए नेतृत्वाने दिला. परदेश दौऱ्यावर गेलेल्या खासदारांच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व करण्याची संधी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना देण्याचे काम एनडीएने केले. हा महाराष्ट्राचा सन्मान आहे, असे खासदार म्हस्के म्हणाले. याऊलट लांगुलचालन आणि दरवाजाबाहेर उभे राहण्याचे काम संजय राऊत आणि मंडळी करीत आहेत, अशी टीका खासदार म्हस्के यांनी केली.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;