यंदा महाराष्ट्रात मान्सून लवकर का दाखल झाला? जाणून घ्या हवामान तज्ज्ञ काय म्हणतात?

यंदा महाराष्ट्रात मान्सून लवकर का दाखल झाला? जाणून घ्या हवामान तज्ज्ञ काय म्हणतात?

यंदा मे महिन्यातच पावसानं महाराष्ट्राला झोडपून काढलं आहे. यावर्षीत तब्बल 12 दिवस आधीच मान्सून राज्यात दाखल झाला आहे, यापूर्वी 2009 साली मान्सून वेळेपूर्वी दाखल झाला होता, त्यानंतर 16 वर्षांनी मान्सूनचं राज्यात वेळेपूर्वी आगमन झालं आहे. राज्यात मान्सून वेळेपूर्वीच का दाखल झाला? त्या मागे नेमकी काय करणं आहेत? याबाबत हवामान तज्ज्ञ प्रवीण कुमार यांनी माहिती दिली आहे, जाणून घेऊयात.

महाराष्ट्रात वेळेच्या आधी मान्सून दाखल होण्याची कारणे जर बघितली तर ती वेगवेगळी आहेत, साधारणतः केरळमध्ये एक जूनपर्यंत मान्सून दाखल होतो, मात्र यंदा 24 मे लाच मान्सून दाखल झाला होता,  आणि त्या भागामध्ये जी सिस्टीम बनली होती त्याला अनुकूल परिस्थिती निर्माण झाली, त्यामुळे मध्य महाराष्ट्र आंध्र प्रदेश आणि तेलंगाना या भागामध्ये पावसाची शक्यता वाढली.

अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र बनले आहे, ते अधिक तीव्र झाल्यानं  ती हवा आपल्या महाराष्ट्राकडे आली आणि त्याला अनुकूल असं वातावरण मिळालं, त्यामुळे मान्सून राज्यात  लवकर दाखल झाला. अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा बनला होता, त्यामुळी जी सिस्टीम बनली, ती मध्य महाराष्ट्रापर्यंत, पुण्यापर्यंत पोहोचली आणि महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये हा पाऊस पडला आहे.

अरबी समुद्रात जी सिस्टीम तयार झाली आहे, तिची जी मोमेंट आहे ती महाराष्ट्रासाठी अनुकूल होती. त्यामुळे राज्यात सध्या मुसळधार पाऊस पडत आहे.  आता सध्या त्या सिस्टीमचा जोर कमी झाला आहे , त्याची तीव्रता कमी झाली आहे, त्यामुळे पावसाचा जोर थोडा कमी होईल मात्र पाऊस सुरूच राहील, पुढील  चार ते पाच दिवस पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज आहे.

विदर्भात मान्सून दाखल होण्याची तारीख दहा ते पंधरा जूनच्या दरम्यान असते,  मागील 30 वर्षांचा रेकॉर्ड आपण बघितला तर दहा ते पंधरा जून दरम्यान मान्सून विदर्भात दाखल झाला आहे, मात्र यंदा विदर्भात वेळेपूर्वीच मान्सून दाखल होऊ शकतो. आम्ही परिस्थितीवर नजर ठेवून आहोत. चंद्रपूर गडचिरोली गोंदिया या भागामध्ये पुढील दोन दिवस येलो अलर्ट देण्यात आलेला आहे, या भागामध्ये चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे, त्यामुळे येलो अलर्ट या जिल्ह्यांसाठी जाहीर केलेला आहे, अशी माहिती हवामान तज्ज्ञ प्रवीण कुमार यांनी दिली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;