मुंबईत आजही पाऊस, राज्यात काही जिल्ह्यांना रेड अलर्ट तर कुठे ऑरेंज अलर्ट

मुंबईत आजही पाऊस, राज्यात काही जिल्ह्यांना रेड अलर्ट तर कुठे ऑरेंज अलर्ट

Maharashtra Rain Alert: महाराष्ट्रात मान्सून १२ दिवस आधी दाखल झाला आहे. गेल्या तीन दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस पडत आहे. मंगळवारीही राज्यात अतिमुसळधार ते मुसळधार पाऊस होणार आहे. मुंबईत पहाटेपासून पाऊस सुरु झाला आहे. मुंबईत हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. राज्यात आतापर्यंत पावसाचे चार बळी गेले आहे. पुणे जिल्ह्यात तिघांचा मृत्यू झाला आहे तर विरारमध्ये एक जण दगावला आहे.

कुठे कोणता अलर्ट

  • रेड अलर्ट: रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर जिल्ह्यांसह सातारा घाटमाथा घाटमाथ्यावर मुसळधारे पावसाचा रेड अलर्ट
  • ऑरेंज अलर्ट: रायगड, पुणे जिल्ह्यांचा घाटमाथा, सातारा, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
  • येलो अलर्ट: ठाणे, मुंबई, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, गडचिरोली जिल्ह्यांत जोरदार पावसाचा इशारा. तसेच उर्वरित राज्यात येलो अलर्ट दिला आहे.

मुंबईत रिमझिम पाऊस

मुंबईत सोमवारी पावसामुळे बिकट परिस्थिती झाली होती. रेल्वे सेवेवर पावसाचा परिणाम झाला होता. भुयारी मेट्रो स्थानकात पाणी गेले होते. मंगळवारी मुंबईत रिमझिम पाऊस सुरु आहे. हिंदमाता, किंग सर्कल, दादर, अंधेरी, वांद्रे भागात रात्रीपासून रिमझिम पाऊस सुरू आहे. सध्या तरी कुठेही पाणी साचलेले नाही. हवामान विभागाने आजही पावसाचा अंदाज वर्तवलेला असल्याने नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे.

पुणे जिल्ह्यात अतिवृष्टीचे तीन बळी

पुणे जिल्ह्यात अतिवृष्टीचे तीन बळी गेले आहे. कर्वेनगर भागात झाड कोसळून एक दुचाकीस्वार ठार तर खेड तालुक्यातील भामा आसखेड धरणात मासेमारी करणाऱ्या तरुणाचा वीज कोसळून मृत्यू झाला. दौंड शहरात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. पुण्यात मुसळधार पावसामुळे राज्य आपत्ती विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

नाशिक जिल्ह्यातील काही भागांत पाऊस झाला. येवला शहरासह परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने दमदार हजेरी लावली. यामुळे दिवसभर उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. परंतु पावसाने शेतात साठवलेला कांदा भिजल्यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;