मुंबईच्या समुद्रात तेल-गॅसचे विपुल भांडार सापडले, इंधनात भारत आत्मनिर्भर होणार ?

मुंबईच्या समुद्रात तेल-गॅसचे विपुल भांडार सापडले, इंधनात भारत आत्मनिर्भर होणार ?

भारताला लागणाऱ्या एकूण इंधनापैकी बहुतांशी इंधन परदेशातून डॉलरमोजून आयात करावे लागते. मात्र, ओएनजीसीला मुंबई ऑफशोअरमध्ये इंधन आणि गॅसचे मोठे साठे सापडले आहे. या साठ्यातून प्रतिदिन हजारो लिटर्सचे इंधन काढता येईल असे म्हटले जात आहे. भारताची तेल तसेच नैसर्गिक गॅस कंपनी ओएनजीसीला (ONGC) Oil and Natural Gas Corporation मुंबईच्या ऑफशोर बेसिनमध्ये तेल आणि नैसर्गिक गॅसचा मोठा साठा सापडला आहे.या नव्या शोधामुळे देशातील घरगुती इंधनाच्या उत्पादनात वाढ होण्याचे संकेत मिळाले आहेत. त्यामुळे भारताची अन्य देशांवर अवलंबित्वाचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे.

कुठे सापडला तेलाचा साठा?

ONGC ने Open Acreage Licensing Policy (OALP) अंतर्गत वाटलेल्या दोन ब्लॉक्समध्ये हे संशोधन केले आहे:

OALP-VI ब्लॉक MB-OSHP-2020/2 – येथे ‘सूर्यमणी’ नावाचा मोठा साठा सापडला आहे.

OALP-III ब्लॉक MB-OSHP-2018/1 – येथे ‘वज्रमणी’ नावाच्या साठ्याचा शोध लागला आहे.

किती होणार उत्पादन

सूर्यमणी साठ्यातून (MBS202HAA-1) जानेवारी-मार्च तिमाही दरम्यान केलेल्या संशोधनात प्रतिदिन 2,235 बॅरल तेल आणि 45,181 क्यूबिक मीटर गॅस उत्पादन होईल असा अंदाज निघाला आहे.त्यानंतर या तिमाहीत दुसऱ्या तेल विहीराची चाचणी घेण्यात आली. या दुसऱ्या तेल विहीरीतून किमान दर दिवसाला ४१३ बॅरल तेल आणि १५,१३२ क्युबिक मीटर गॅस उत्पादन होईल असे म्हटले जात आहे. व्रजमणी नावाच्या साठ्यातून अन्य एका विहीरीतून (MBS181HNA-1)प्रति दिन २,१२२ बॅरल तेल आणि ८३,१२० क्युबिक मीटर गॅसचे उत्पादन होईल असे म्हटले जात आहे.

मुंबईच्या ऑफशोरचे महत्व

मुंबईतील ऑफशोर भारतातील सर्वात मोठ्या तेल आणि गॅस साठ्या पैकी एक आहे. येथील बॉम्बे हाय,बसीन, हीरा, नीलम आणि पन्ना-मुक्ता सारख्या विहीरींतून देशाला इंधन पुरवठा केला जातो. सध्या बॉम्बे हायमधून प्रतिदिन १,३४,००० बॅरल तेल आणि १० मिलियन स्टँडर्ड क्युबिक मीटर गॅसचे उत्पादन होते.

KG बेसिनमध्ये यश

मुंबई ऑफशोरशिवाय, ONGC ने कृष्णा-गोदावरी (KG) बेसिनच्या ऑनलँड ब्लॉकमध्येही तेल आणि गॅसची नवे साठे शोधले आहे.येथील यंदापल्ली-1 विहीरीतून हायड्रोकार्बन असल्याचे प्राथमिक संकेत मिळाले आहेत.

आत्मनिर्भर भारताकडे एक पाऊल

भारताला लागणाऱ्या ८५ टक्के इंधन आणि गॅसपैकी पन्नास टक्के आयात करावा लागतो. ओएनजीसीच्या नव्या शोधाने देशातील इंधनाची गरज भागण्यास आणखी मदत होणार आहे. परंतू या साठ्याचा विकास आणि प्रत्यक्षात उत्पादन केव्हा सुरु होईल या संदर्भात किती वेळ लागेल याबाबत अद्याप स्पष्टता नाही.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;