खंडणीप्रकरणात डॅडीची सुटका, पण तुरुंगातच राहणार, तर दाऊदच्या हस्तकाला जामीन

खंडणीप्रकरणात डॅडीची सुटका, पण तुरुंगातच राहणार, तर दाऊदच्या हस्तकाला जामीन

शिवसेनेचे नेते कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्येप्रतकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला कुख्यात गुंड, अरूण गवळी याची 2008 सालच्या खंडणी प्रकरणातून विशेष मोक्का न्यायालयाने बुधवारी निर्दोष सुटका केली. मात्र कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्येप्रकरणी अरूण गवळी हा नागपूर मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. त्यामुळे खंडणी प्रकरणात त्याची निर्दोष सुटका झाली असली तर गवळी याला अजूनही कारागृहातच रहावं लागणार आहे.

अरूण गवळी याच्यासह त्याचा धाकटा भाऊ विजय अहिर तसेच टोलीतील पाच सदस्यांचीही मुंबई सत्र विशेष मोक्का न्यायालयाने खंडणी प्रकरणातून निर्दोष सुटका केली. या प्रकरणात एकूण नऊ आरोपींचा समावेश होता. मात्र त्यांच्यापैकी एकाचा खटल्या दरम्यान मृत्यू झाला तर एकजण माफीचा साक्षीदार झाला. तर अरुण गवळी याच्यासह इतर आरोपींवरील खंडणीचा आरोप सिद्ध करण्यात सरकारी पक्ष पूर्णपणे अपयशी ठरला, असे निरीक्षण महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत स्थापन (मोक्का) विशेष न्यायालयाचे न्यायाधीश बी. डी. शेळके यांनी आरोपींची निर्दोष सुटका करताना नोंदवलं.

सरकारी पक्षाने आरोपींविरोधात न्यायालयात सादर केलेल्या पुराव्यांचा विचार करता सरकारी पक्षाला आरोपींवरील आरोप सिद्ध करता आले नाहीत. त्यामुळे, गवळीसह अन्य आरोपीना मोक्कांतर्गत गुन्ह्यांसाठी दोषी ठरवता येणार नाही, असेही न्यायालयाने आदेशात नमूद केले. त्यामुळे अरुण गवळी आणि इतर आरोपींची खंडणीप्रकरणात निर्दोष सुटका करण्यात आली. असे असले तरी जामसंडेकर हत्याप्रकरणी जन्मठेप झाल्याने डॅडीला उर्वित आयुष्य तुरूंगातच घालवावं लागणार आहे.

दाऊदच्या हस्तकाला जामीन

दरम्यान कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम याचा सहकारी तारिक परवीन याला उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. दाऊद इब्राहिमचा सहकारी तारिक परवीन याला 2020 सालच्या खंडणी प्रकरणात उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला आहे. परवीन मागील पाच वर्षांपासून तळोजा कारागृहात कैद होता, मात्र हा खटला पूर्ण होण्याची शक्यता नसल्याचा मुद्दा न्यायालयात मांडण्यात आला. खटल्याविना कारावास म्हणजे शिक्षा ठोठावल्यासारखे असल्याची टिप्पणी न्यायालयाने केली.

न्यायशास्त्रानुसार “दोष सिद्ध होईपर्यंत आरोपी निर्दोष” या तत्त्वाचा उल्लेख करत न्यायालयाने परवीनला जामीन देत दिलासा दिला. परवीनवर मोक्का आणि अनेक आयपीसी अंतर्गत खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि त्याला फेब्रुवारी 2020 मध्ये अटक झाली होती. पुरावा सिद्ध झाल्यास शिक्षा नक्कीच होईल, मात्र सध्या दीर्घ तुरुंगवास झाल्याचे कारण देत न्यायालयाने जामीन मंजूर केला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

हा घटस्फोट झाला तर तब्बल 3387 कोटींचं होणार विभाजन; फिल्म इंडस्ट्रीतील सर्वांत महागडा डिवॉर्स हा घटस्फोट झाला तर तब्बल 3387 कोटींचं होणार विभाजन; फिल्म इंडस्ट्रीतील सर्वांत महागडा डिवॉर्स
जवळपास तीन दशकांच्या संसारानंतर ऑस्ट्रेलियन अभिनेता हग जॅकमन आणि ऑस्ट्रेलियन अभिनेत्री डेबोरा ली फर्नेस यांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे....
आता हे मला खूप महागात पडतंय, कृषीमंत्री कोकाटेंच्या विधानावर अजित पवार यांची प्रतिक्रिया
पाऊस आणि भुस्खलनामुळे ईशान्येकडील राज्यात हाहाःकार, हजारो नागरिक विस्थापित
Ranjeet Kasale : नेत्यांची पोलखोल करणं भोवले; बडतर्फ पोलीस अधिकारी रणजीत कासलेला अटक
बिग बॉस विजेता सूरज चव्हाणचा झाला साखरपुडा? कोण आहे ती मुलगी? जाणून घ्या सत्य
पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या हिमाचल प्रदेशमधून 20 वर्षीय तरुणाला अटक
रिंकू सिंहची विकेट पडली, थेट खासदार पटवली; लग्नाची तारीखही झाली निश्चित