सैफशी घटस्फोटामुळे नाही तर ‘या’ खास व्यक्तीला गमावल्यानंतर पूर्णपणे खचली होती अमृता
बॉलिवूड इंडस्ट्रीतील काही जोडप्यांच्या घटस्फोटाची चर्चा आजसुद्धा होते. त्यापैकीच एक म्हणजे अभिनेता सैफ अली खान आणि अमृता सिंग. या दोघांनी 1991 मध्ये लग्न केलं होतं. अमृता आणि सैफच्या वयात 12 वर्षांचं अंतर होतं. सैफ हा अमृतापेक्षा 12 वर्षांनी लहान आहे. या दोघांचे धर्मही वेगळे आहेत. नात्यातील मतभेदांमुळे आणि सततच्या भांडणांमुळे या दोघांचा संसार फार काळ टिकू शकला नाही. लग्नाच्या 13 वर्षांनंतर 2004 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतर दिलेल्या एका मुलाखतीत अमृताला त्याविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा अमृताने अशी कबुली दिली होती की, घटस्फोट नव्हे तर दुसऱ्या एका घटनेचा तिच्या आयुष्यावर मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला होता, ज्यामुळे ती पूर्णपणे खचली होती.
अभिनेत्री पूजा बेदीच्या टॉक शोमध्ये अमृताने हजेली लावली होती. या शोमध्ये पूजाने अमृताला तिच्या घटस्फोटाविषयी प्रश्न विचारला होता. त्यावर अमृताने सांगितलं की, घटस्फोट नाही तर तिच्या आईचं निधन हा आयुष्यातील सर्वांत कठीण काळ होता. “माझ्या आयुष्यातील सर्वांत कठीण काळ तो होता, जेव्हा माझी आई मला सोडून गेली. ती माझ्या आयुष्याचा स्तंभ आणि माझी ओळख होती. आईशिवाय माझं कोणीच जवळचं नव्हतं. तसं पाहिलं तर आईशिवाय माझं दुसरं कोणतं कुटुंबच नव्हतं. मी एका विभक्त कुटुंबातून होते आणि माझे कोणीत भाऊ-बहीण नाहीत. माझ्याकडे फक्त आई होती आणि तिला गमावणं हा माझ्यासाठी खूप मोठा धक्का होता. त्यातून बाहेर पडणं खूप कठीण होतं”, अशा शब्दांत अमृताने भावना व्यक्त केल्या.
याविषयी ती पुढे म्हणाली, “नंतर जेव्हा इब्राहिम आजारी पडला होता, तेव्हा माझ्या आयुष्यातील दुसरा सर्वांत कठीण काळ होता. त्यामुळे माझा घटस्फोट हा या यादीत त्याअर्थी बऱ्याच अंशी खाली आहे.” अमृता आणि सैफ यांना दोन मुलं आहेत. सारा अली खान आणि इब्राहिम अली खान या दोघांनीही चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलंय. सैफशी घटस्फोटानंतर अमृतानेच दोन्ही मुलांचा सांभाळ केला. तिने दुसरं लग्न केलं नाही. तर दुसरीकडे सैफने अभिनेत्री करीना कपूरशी दुसरं लग्न केलं. या दोघांनाही तैमुर आणि जहांगीर ही दोन मुलं आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List