1300 कोटींचे दागिने, 40 कोटींचा ड्रेस,लाखोंचे पाकीट; कान्समध्ये उर्वशी रौतेलाच्या लूकची किंमत शाहरूखच्या ‘मन्नत’पेक्षाही जास्त
सध्या सर्वत्र चर्चा आहे ती कान्स फिल्म फेस्टिव्हल 2025ची. अनेक अभिनेत्री कान्सच्या रेड कार्पेटवर आपली अदाकारी दाखवतात. आपल्या सौंदर्याने सर्वांना भुरळ घालतात. सध्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये चर्चा आहे ते एका बॉलिवूड अभिनेत्रीची ती म्हणजे उर्वशी रौतेला. अभिनेत्री नेहमीच तिच्या खास फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते. यावेळी कान्स फिल्म फेस्टिव्हल 2025 च्या रेड कार्पेटवर तिने तिच्या पहिल्याच लूकने खळबळ उडवून दिली आहे.
कान्सच्या पहिल्या दिवशी, उर्वशी रौतेलाच्या लूकने खळबळ
कान्सच्या पहिल्या दिवशी, उर्वशीने एका आकर्षक आणि महागड्या गाऊनमध्ये रेड कार्पेटवर वॉक केला. या गाऊनची किंमत जाणून धक्का बसेल. कान्समध्ये उर्वशीने परिधान केलेला कस्टम-मेड गाऊन प्रसिद्ध डिझायनर मायकेल सिन्को यांनी डिझाइन केला आहे. आणि फक्त ड्रेसच नाही तर तिच्या दागिन्यांची आणि तिच्या युनिक पर्सचीही तेवढीच चर्चा होताना दिसतेय.
करोडोंचा गाऊन अन् दागिने, किंमत जाणून धक्का बसेल
उर्वशीच्या जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तिने परिधान केलेल्या गाऊनची किंमत तब्बल 4.8 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच अंदाजे 40 कोटी रुपये आहे. या गाऊनची खासियत केवळ त्याची किंमतच नाही तर त्याची अद्भुत रचना देखील आहे. उर्वशीचा हा गाऊन मेक्सिकन कलेपासून प्रेरित आहे. त्याच्या निर्मितीमध्ये हजारो तास खर्च करण्यात आले आणि त्यात उत्कृष्ट क्रिस्टल्स, मौल्यवान हिरे आणि विविध प्रकारचे कापड वापरले गेले आहेत. या गाऊनची रचना मेक्सिकन आणि अॅझ्टेक कला प्रतिबिंबित करते.
मायकेल सिन्को हे आधीच टॉप डिझायनर्सपैकी एक मानले जातात आणि त्यांच्या नावाने या गाऊनच्या सौंदर्यात आणखीनच भर घातली आहे. कान्ससारख्या मोठ्या कार्यक्रमासाठी हा गाऊन एक परिपूर्ण पर्याय वाटत आहे. ज्यामुळे उर्वशी रेड कार्पेटवर सर्वांपेक्षा वेगळी आणि खास दिसली.
हजारो कोटींच्या दागिन्यांमध्ये असं काय आहे खास?
फक्त गाऊनच नाही तर उर्वशीने कोट्यवधी रुपयांचे दागिने घातले होते त्यामुळे तिचा लूक हा आणखीनच आकर्षक दिसत होता. तिच्या दागिन्यांची एकूण किंमत जाणून तुम्हाला धक्का बसेल. कारण माहितीनुसार, तिने जवळपास 151 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 1300 कोंटींचे दागिने परिधान केले होते. तिच्या दागिन्यांमध्ये मौसाईफ रेड डायमंड, ओपेनहायमर ब्लू डायमंड, ड्रेस्डेन ग्रीन डायमंड आणि टिफनी यलो डायमंड असे अनेक महागडे हिरे वापरले गेले होते. या दागिन्यांव्यतिरिक्त, उर्वशीने ज्युडिथ लीबरचा लाल रंगाचा पोपटाच्या आकाराचा खरा डायमंड क्लच (पर्स) देखील घेतली होता ज्याची किंमत सुमारे 6 लाख असल्याचं सांगितलं जातं आहे. म्हणजेच, जर उर्वशीच्या जवळच्या सूत्राचा दावा बरोबर असेल, तर उर्वशीच्या या लूकची किंमत शाहरुख खानच्या ‘मन्नत’पेक्षा कितीतरी पटीने ठरेल असं म्हणायला हरकत नाही. कारण मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘मन्नत’ची किंमत सुमारे 200 कोटी आहे.
सोशल मीडियावर चर्चेचा विषय
काही लोक उर्वशी रौतेलाच्या पहिल्या लूकला शालिनी पासीची कॉपी असेही म्हणत आहेत. पण इतक्या महागड्या आणि सुंदर गाऊन आणि दागिन्यांसह रेड कार्पेटवर आपला आकर्षण आणि स्टाईल दाखवणारी उर्वशी पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List