जमिनीच्या मोबदल्यासाठी शेतकरी आक्रमक, भर पावसात रेल्वे रुळांवर ठिय्या, अखेर प्रशासनाने उचलले पाऊल

जमिनीच्या मोबदल्यासाठी शेतकरी आक्रमक, भर पावसात रेल्वे रुळांवर ठिय्या, अखेर प्रशासनाने उचलले पाऊल

सांगलीमधून मोठी बातमी समोर येत आहे. रेल्वे प्रशासनाकडून संपादित करण्यात आलेल्या जमिनीचा मोबदला मिळाला यासाठी शेतकरी आक्रमक झाले होते. बाधित शेतकऱ्यांकडून रुळांवरच ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले होते. तब्बल सहा तास शेतकऱ्यांनी रुळावर आंदोलन केलं. या आंदोलनाचा मोठा फटका हा रेल्वे वाहतुकीला बसला आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे पुण्याहून मिरज, कोल्हापूर आणि कर्नाटककडे जाणारी रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती.  अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीचे आश्वासन दिल्यानंतर शेतकरी मागे हटले.

सांगलीतील शेतकरी आंदोलनामुळे एका पॅसेंजरसह सह्याद्री आणि महालक्ष्मी एक्स्प्रेस भिलवडी रेल्वे स्थानकावर जवळपास अर्ध्या तासाहून अधिक काळापासून खोळंबली होती. दरम्यान त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडून या शेतकऱ्यांना आंदोलन स्थगित करण्याची विनंती करण्यात आली. रेल्वे प्रशासनाकडून संपादित करण्यात आलेल्या जमिनीचा मोबदला मिळावा यासाठी हे शतकरी चांगलेच आक्रमक झाले होते.

शेतकरी प्रचंड आक्रमक

सांगलीत प्रचंड पावसातही या बाधित शेतकऱ्यांचं रेल्वे रुळावर आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनामुळे पुण्याहून मिरज, कोल्हापूर आणि कर्नाटककडे जाणारी वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती. या आंदोलनामुळे एका पॅसेंजरसह सह्याद्री आणि महालक्ष्मी एक्स्प्रेस भिलवडी रेल्वे स्थानकावर जवळपास अर्ध्या तासाहून अधिक काळ खोळंबली होती. शेतकरी प्रचंड आक्रमक झाले होते.

अखेर आंदोलन स्थगित

अखेर या शेतकऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना बैठकीचं आश्वासन देण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर एक तासापासून रोखून धरलेली पॅसेंजर अखेर शेतकऱ्यांनी सोडली. बैठकीच्या अश्वासनानंतर शेतकऱ्यांनी रेल्वे रुळावरील आंदोलन देखील मागे घेतले आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

लढाऊ विमानांच्या घेऱयात ट्रम्प सौदीत; 12.1 लाख कोटींचा संरक्षण करार लढाऊ विमानांच्या घेऱयात ट्रम्प सौदीत; 12.1 लाख कोटींचा संरक्षण करार
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आजपासून सौदी अरेबियाच्या दौऱयावर असून ते आज सौदीच्या एफ 15 या लढाऊ विमानांच्या घेऱ्यात देशात दाखल...
मंत्रालयाच्या नियंत्रण कक्षात धमकीचा ई-मेल; दोन दिवसांत बॉम्बस्फोट होणार
जोगेश्वरीच्या रायगड मिलिटरी स्कूलचा निकाल 100 टक्के!
कुख्यात गजा मारणेला दिली बिर्याणी; पाच पोलीस निलंबित
तुरुंगातील कैद्यांची उत्पादने कैद्यांसाठीच वापरणार
धर्मवीर संभाजी महाराज जन्मोत्सव सोहळा
‘कामत गोविंदा’चे श्रीकांत कामत यांचे निधन