प्रसन्न आहात ना?…प्रेमानंद महाराजांनी विचारताच अनुष्का झाली भावूक अन् रडू लागली,पाहा व्हिडीओ
कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर एका दिवसानंतर, विराट कोहली त्याची पत्नी अनुष्का शर्मासह प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात त्यांचे दर्शन घेण्यासाठी पोहोचले. दोघांचाही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. काही दिवसांपूर्वी जेव्हा कोहलीचे काही कारणास्तव अडचणी सुरु होत्या तेव्हा तो प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात येऊन भेट देऊन गेला होता आणि त्यांचा आशीर्वाद घेतल्यानंतर कोहलीने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये शानदार फलंदाजी करून भारताला चॅम्पियन बनवले. विराट आणि अनुष्का हे प्रेमानंद महाराजांचे भक्त आहेत.ते त्यांना खूप मानतात. त्यामुळे ते नेहमीच त्यांच्या आश्रमाला भेट देत असतात.
अनुष्काच्या डोळ्यातही पाणी आलेलं
आता पुन्हा एकदा कोहली आणि अनुष्काने आश्रमाला भेट दिली. यावेळी, कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर, कोहलीने प्रेमानंद महाराजांना भेटून त्यांचे आशीर्वाद घेतले. हे होघेही जेव्हा प्रेमानंद महाराजांना भेटले तेव्हा महाराजांनी त्यांना दोघांना प्रश्न विचारला की, तुम्ही आनंदी आहात का? तेव्हा विराट कोहलीने होकारार्थी उत्तर दिलं. त्याच वेळी अनुष्काच्या डोळ्यातही पाणी आलेलं दिसलं. महाराजांनी कोहली आणि अनुष्कासोबत बराच वेळ गप्पा मारल्या. दोघेही महाराजांचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकत होते. प्रेमानंद महाराजांना भेटल्यानंतर कोहली आणि अनुष्का खूप आनंदी दिसत होती तसेच तिच्या डोळ्यात शेवटपर्यंत पाणी होते. ती महाराजांची शिकवण ऐकून भावूकही झाली होती. दोघांच्याही चेहऱ्यावर समाधानाचे भाव स्पष्ट दिसत होते. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा श्री राधाकेलीकुंज आश्रमात सुमारे तीन तास थांबले होते.
विराट आणि अनुष्काच्या हातातील इलेक्ट्रॉनिक अंगठीने लक्ष वेधलं
दरम्यान प्रेमानंद महाराजांच्या भेटीदरम्यान अनुष्काने काळा-पांढरा रंगाचा साधा सूट घातला होता, तर विराटने फॉर्मल पँट-शर्ट. या भेटीदरम्यान सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते विराट आणि अनुष्काच्या हातातील इलेक्ट्रॉनिक अंगठीने. ही इलेक्ट्रॉनिक अंगठी नेमकी जपाची अंगठी म्हणूनही ओळखली जाते. म्हणजे ज्यांना प्रवासात जपमाळ घेऊन जाणं शक्य नसंत ते ही अंगठी वापरतात. त्यावर तुम्ही जप कराल तसे ते मोजले जाते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List