‘फॅमिली मॅन 3’मधील अभिनेत्याचा मृत्यू, मित्रांसोबत जंगलात फिरायला गेला पण…

‘फॅमिली मॅन 3’मधील अभिनेत्याचा मृत्यू, मित्रांसोबत जंगलात फिरायला गेला पण…

अभिनेता मनोज वाजपेयी आणि जयदीप अहलावत यांची महत्वपूर्ण भूमिका असलेली ‘फॅमिली मॅन 3’ सर्वांनाच माहीत आहे, ती अतिशय लोकप्रिय वेबसीरिजही ठरली. मात्र याच वेबसीरिजमधील कलाकारांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये काम केलेल्या अभिनेत्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी आणि तितकीच धक्कादायक घटना घडली आहे. रोहित बासफोर असे मृत अभिनेत्याचे नाव आहे. तो त्याच्या मित्रांसह आसामच्या गरभंगा जंगलात फिरायला गेला होता असे सांगण्यात येत आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, धबधब्यामध्ये पडून रोहितचा मृत्यू झाला. मात्र त्याच्या कुटुंबियांकडून वेगळीच माहिती मिळत आहे. रोहीत हा काही महिन्यांपूर्वीच त्याच्या घरी परत आला होता.

रोहित हा ‘फॅमिली मॅन 3’ या हिट वेब सिरीजचा भाग आहे. मात्र त्याच्याबद्दल आलेल्या या मोठ्या बातमीमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. रोहित त्याच्या मित्रांसोबत फिरायला गेला होता, त्याच्या ग्रुपमध्ये 9 लोक होते. स्थानिक बातम्यांचा हवाला देत टाईम्स नाऊच्या वृत्तात म्हटले आहे की, रोहित हा दुपारी 2.30 च्या सुमारास घराबाहेर पडला, परंतु काही वेळानंतरच त्याचा फोन लागणं बंद झालं आणि घरचे सगळे काळजीत पडले.

मित्रांनी दिली माहिती

मात्र, नंतर त्याच्या मित्रांनी फोन करून अपघाताची माहिती दिली आणि रोहितला रुग्णालयात नेण्यात आले. पण, तो रुग्णालयात पोहोचेपर्यंत बराच उशीर झाला होता, त्याला तेथे मृत घोषित करण्यात आलं. पोस्टमार्टमपूर्वी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास घडली. रोहित त्याच्या नऊ मित्रांसह पिकनिकला गेला होता तेव्हा तो धबधब्यामध्ये पडला असा दावा करण्यात येत आहे. “आम्हाला दुपारी 4 वाजता या घनेचीमाहिती मिळाली आणि आम्ही 4:30 वाजता घटनास्थळी पोहोचलो. नंतर एसडीआरएफ टीमने संध्याकाळी 6:30 वाजता मृतदेह बाहेर काढला.” अशी माहिती याप्रकरणी एका अधिकाऱ्याने दिली.

कुटुंबियांचा वेगळाच दावा

मित्रांसोबत फिरायाला गेलेला रोहित हा चुकून धबधब्यामध्ये पडला, असे प्राथमिक तपासात आढळलं आहे. सध्या तरी कोणताही गैरप्रकार झाल्याचा संशय नाही, असे पोलिसांनी सांगितलं. रोहितचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला असून याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे. मात्र, दुसऱ्या एका वृत्तानुसार, रोहितच्या कुटुंबाने वेगळाच दावा केला आहे. याप्रकरणात काही गूढ असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यांच्या सांगण्यानुसार काही दिवसांपूर्वी रोहीत हा हा पार्किंगच्या वादात अडकला होता. रोहितच्या कुटुंबियांनी काही लोकांवर संशयही व्यक्त केला आहे.  याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या सुरक्षेत वाढ, ‘झेड’ श्रेणीच्या सुरक्षा कवचात बुलेटप्रूफ कारचा समावेश परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या सुरक्षेत वाढ, ‘झेड’ श्रेणीच्या सुरक्षा कवचात बुलेटप्रूफ कारचा समावेश
हिंदुस्थान आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने जयशंकर यांच्या...
Operation Sindoor – पाकिस्तानच्या उद्ध्वस्त झालेल्या एअरबेसचे सॅटेलाईट फोटो आले समोर; धावपट्टी, इमारती बेचिराख
Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 14 मे 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस
अंबाबाई, जोतिबा मंदिरात तोकडे कपडे घालून येण्यास मनाई
कश्मीर प्रश्नात तिसऱ्या देशाची मध्यस्थी मान्य नाही! युद्धविरामाच्या चर्चेत व्यापाराचा मुद्दा नव्हता, ट्रम्प यांचा दावा परराष्ट्र मंत्रालयाने फेटाळला
पाकिस्तानात घुसून मोदींनी नक्षलवाद्यांना खतम केले! बावनकुळेंचे अगाध ज्ञान
जम्मू-कश्मीर अजूनही दहशतीखाली, ‘लश्कर-ए-तोयबा’च्या तीन अतिरेक्यांचा शोपियानमध्ये चकमकीत खात्मा