Pahalgam Terror Attack – 10 मिनिटांचा फरक अन् संपूर्ण जैन परिवार वाचला, सांगितला भयानक अनुभव

Pahalgam Terror Attack – 10 मिनिटांचा फरक अन् संपूर्ण जैन परिवार वाचला, सांगितला भयानक अनुभव

मंगळवारी (22 एप्रिल 2025) दुपारी जम्मू-कश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या भयंकर हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला असून, या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. मृतांमध्ये अनेक पर्यटकांचा समावेश असून, महाराष्ट्रातील नागरिकांबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र, एका विलक्षण योगायोगामुळे बुलढाण्याच्या जैन कुटुंबाचा जीव वाचला आहे.

ज्येष्ठ पत्रकार अरुण जैन यांचे भाऊ निलेश जैन (मुंबई येथे कार्यरत जीएसटी अधिकारी), त्यांची पत्नी श्वेता, मुलगी अनुष्का आणि अरुण जैन यांची दोन मुले ऋषभ व पारस हे पर्यटनासाठी जम्मू-कश्मीरमध्ये गेले होते. 21 एप्रिल रोजी ते पहलगाममध्ये पोहोचले होते आणि दुसर्‍या दिवशी म्हणजेच 22 एप्रिल रोजी सकाळी मिनी-स्वित्झर्लंड म्हणून ओळखल्या जाणार्‍या प्रसिद्ध साईट-सीन पॉईंटला जाण्याचा त्यांचा बेत होता. मात्र, काही अंतर्गत कारणांमुळे त्यांना निघण्यास 10 मिनिटांचा उशीर झाला आणि याच उशीरामुळे त्यांचा जीव वाचला. कारण, अगदी त्याच वेळी त्या साईटवर दहशतवाद्यांनी अंधाधुंद गोळीबार केला आणि अनेक पर्यटकांचा मृत्यू झाला. गोळीबाराची माहिती हॉटेलमध्ये पोहोचताच, जैन कुटुंबाने बाहेर जाण्याचा विचार सोडून दिला. परिणामी, संपूर्ण कुटुंब एका भीषण हल्ल्यातून थोडक्यात बचावले.

सरकारकडे मदतीची मागणी

जैन कुटुंबीयांनी एक व्हिडीओ जारी करून त्यांच्या सुरक्षिततेची माहिती दिली आहे. व्हिडीओत निलेश जैन यांनी सरकारकडे सुरक्षित ठिकाणी हलवण्याची विनंती केली होती. जम्मू-कश्मीर प्रशासनाकडून तत्काळ प्रतिसाद मिळाला असून, आता त्यांना लवकरच श्रीनगरकडे हलवले जाणार आहे. ‘संपूर्ण कुटुंब सुरक्षित आहे. आम्ही लवकरच श्रीनगरकडे रवाना होत आहोत. आम्हा सर्वांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करणार्‍या सर्वांचे मनःपूर्वक आभार’, असं अरुण जैन यांनी सांगितलं.

Pahalgam Terror Attack- युरोप व्हिसा न मिळाल्याने कश्मीरला हनिमूनसाठी गेले, नौदल अधिकाऱ्याला तिथेच मृत्युने गाठले! 

अरुण जैन यांनी म्हटलं, ‘हे आमच्यासाठी दुसर्‍यांदा जन्मल्यासारखं आहे. त्या क्षणांचा विचार केला की अंगावर शहारा येतो. आम्ही आज जिवंत आहोत हे केवळ एका चूकलेल्या वेळेमुळे हा चमत्कारच आहे.’ महाराष्ट्र सरकारनेही परिस्थितीची गंभीर दखल घेतली असून, राज्यातील सर्व पर्यटकांची माहिती घेण्यासाठी विशेष नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडूनही जैन कुटुंबाशी संपर्क साधण्यात आला असून, त्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ती सर्व मदत दिली जात असल्याचे सांगण्यात आले आहे.

Pahalgam Terror Attack- मी कलमा म्हणू शकलो, म्हणून मी वाचलो! प्राध्यापकाची मृत्युच्या दाढेतून सुटका

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;