मंत्रिमंडळ बैठकीसाठी दोन कोटींची होणार उधळपट्टी, चौंडीत जय्यत तयारी सुरू; प्रा. राम शिंदे यांनी घेतला आढावा

मंत्रिमंडळ बैठकीसाठी दोन कोटींची होणार उधळपट्टी, चौंडीत जय्यत तयारी सुरू; प्रा. राम शिंदे यांनी घेतला आढावा

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी चौंडी येथे येत्या 6 मे रोजी राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीसाठी 41 मंत्र्यांचा प्रोटोकॉल ठरविण्यात आला असून, प्रशासनाकडून तयारीला वेग आला आहे. दरम्यान, बैठकीसाठी दोन कोटी रुपयांची उधळपट्टी होणार असून, राज्य सरकारने हा निधी जिल्हा प्रशासनाकडे वर्ग केला आहे.

या बैठकीच्या पार्श्वभूमीवर सभापती राम शिंदे यांनी भेट देत पाहणी करून अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, पोलीस अधीक्षक राकेश ओला आणि जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी आशीष येरेकर उपस्थित होते.

राज्य शासनाच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वाची मानली जात असून, संपूर्ण यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. सुरक्षा, वाहतूक व्यवस्था आणि अन्य नियोजन सुसूत्रपणे पार पडावे, यासाठी स्थानिक प्रशासन युद्धपातळीवर काम करीत आहे, अशी माहिती सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिली.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान असलेल्या चौंडी (ता. जामखेड) येथे 6 मे रोजी महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. राज्याच्या इतिहासात पहिल्यादांच ग्रामीण भागात अशी बैठक होत आहे. बैठकीला तीनच दिवस राहिल्याने जिल्हा प्रशासनाची नियोजनासाठी धावपळ उडाली आहे.

‘जर्मन हँगर’ प्रकारचा मंडप

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचा कार्यक्रम ज्या ठिकाणी होतो, त्याच मैदानावर बैठकीसाठी विस्तीर्ण मंडप उभारला जात आहे. 265 फूट लांब आणि 132 फूट रुंद आकाराचा ‘जर्मन हँगर’ प्रकारचा मंडप उभारला जात आहे. मंडपात विविध वातानुकूलित कक्ष निर्माण केले जातील. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसाठी ग्रीन रूम, भेटीसाठी येणारे आमदार-खासदार, तसेच वरिष्ठ अधिकारी यांच्यासाठी कक्ष, मुख्य सचिवांचे कार्यालय, मंत्री परिषद सभागृह, स्वयंपाकघर, भोजन, पत्रकार कक्ष, सुरक्षा व वाहनचालक यांच्यासाठी स्वतंत्र कक्ष, भोजन व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या मंडपात किमान साडेतीन हजार खुच्र्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. इंटरनेटसाठी ‘वाय-फाय’ची व्यवस्था करण्यात आली आहे.

सुरक्षेसाठी 17 समित्यांची नियुक्ती

मंडप उभारणीच्या कामाबरोबर सुरक्षा व्यवस्थेची पाहणी करण्यासाठी मुख्य सचिवांच्या कार्यालयातील पथक पुढील दिवस चौंडीत तळ ठोकणार आहे. नाशिकचे विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांनी जिल्ह्यातील अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतली. यावेळी सभापती प्रा. राम शिंदे उपस्थित होते. नियोजनासाठी तब्बल 17 समित्यांची नियुक्ती केली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आपल्या बरोबरची व्यक्ती पुढे जाऊ लागली की असुरक्षित वाटतं? अशोक सराफ यांची शिकवण लक्षात ठेवा.. आपल्या बरोबरची व्यक्ती पुढे जाऊ लागली की असुरक्षित वाटतं? अशोक सराफ यांची शिकवण लक्षात ठेवा..
एखाद्या श्रेत्रात आपल्या सोबतची व्यक्ती आपल्या पुढे जाऊ लागली की काहींना असुरक्षित वाटू लागतं. मग अशातून एकमेकांविषयी ईर्षा, द्वेष आणि...
मी हिंदू, मी दलित..; पहलगाम हल्ल्यानंतर धर्माबद्दल काय म्हणाला ‘बिग बॉस 18’ फेम अभिनेता?
आईसह तुझीही कोयत्याने खांडोळी करून टाकीन म्हणत अल्पवयीन सावत्र मुलीवर अत्याचार, नराधम बाप जेरबंद
समृद्धी महामार्गावर बुलढाण्यातील कुटुंबाला लुटले! गाडीसमोर आडवी गाडी लावली 12 लाखांच्या दागिन्यांची लूट
लांड्या लबाड्या करून निवडणुका जिंकण्यासाठी लाडकी बहीण योजना आणली – संजय राऊत
12 दिवस होऊनही सरकारने पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला नाही, संजय राऊत यांचा घणाघात
पाकड्यांच्या कुरापती सुरूच; सलग दहाव्या दिवशी शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार