तुम्ही खरेदी केलेले औषध खरं की बनावट कसे ओळखाल? वाचा सविस्तर

तुम्ही खरेदी केलेले औषध खरं की बनावट कसे ओळखाल? वाचा सविस्तर

औषधं आपल्याला गंभीर आजारांपासून बरं करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. आजच्या काळात औषधांमुळे अनेक जटिल रोगांवर उपचार शक्य झाले आहेत. अँटिबायोटिक्स, लसी यांसारख्या औषधांनी जगभरात करोडो लोकांचे प्राण वाचवले. पण तुम्हाला माहिती आहे का, की काही मेडिकल स्टोअर्सवर खऱ्या औषधांच्या नावाखाली बनावट औषधांची विक्री जोरात सुरू आहे? ही बाब करोडो लोकांच्या जीवाशी खेळण्यासारखी आहे. बनावट औषधं घेतल्याने आजार बरा होण्याऐवजी नवीन गंभीर आजार उद्भवू शकतात. म्हणूनच या लेखात आम्ही तुम्हाला काही खास पद्धती सांगणार आहोत, ज्यांच्या मदतीने तुम्ही मेडिकल स्टोअरवर खरी आणि बनावट औषधांची ओळख करू शकाल.

1. पॅकेजिंग तपासा : औषधांचं पॅकेजिंग नीट नसतं. बऱ्याचदा पॅकेजिंगवर औषधाच्या नावाची स्पेलिंग चुकलेली असते. नावात स्पेलिंगची चूक असेल किंवा पॅकेजिंग विचित्र वाटलं, तर हे औषध बनावट असण्याची शक्यता आहे. पॅकेजिंगवर छपाईचा दर्जा आणि रंगही तपासा. बनावट औषधांचं पॅकेजिंग अस्पष्ट असू शकतं.

2. क्यूआर कोड : आजकाल अनेक औषधांवर क्यूआर कोड असतो. या कोडच्या मदतीने तुम्ही औषधाबद्दल सर्व माहिती सहज मिळवू शकता. औषध बनवणाऱ्या कंपनीची खातरजमा करणंही यामुळे शक्य होतं. क्यूआर कोड स्कॅन करण्यासाठी विश्वसनीय अॅप वापरा आणि इंटरनेट कनेक्शन तपासा, जेणेकरून माहिती अचूक मिळेल.

3. विश्वसनीय मेडिकल स्टोअरमधून खरेदी : कोणत्याही मेडिकल स्टोअरवरून औषधं घेऊ नयेत. नेहमी परवानाधारक आणि विश्वसनीय मेडिकल स्टोअरमधून औषधं खरेदी करा. औषध खरेदी केल्यानंतर त्याचं अधिकृत पक्कं बिल घ्यायला विसरू नका. बनावट औषधं विकणाऱ्या दुकानांमध्ये बिल दिलं जात नाही. मेडिकल स्टोअरचा परवाना तपासा. परवान्याशिवाय औषधविक्री बेकायदेशीर आहे आणि अशा दुकानांमध्ये बनावट औषधं मिळण्याची शक्यता जास्त असते.

4. औषधं डॉक्टरांना दाखवा : मेडिकल स्टोअरमधून औषधं खरेदी केल्यानंतर ती तुमच्या डॉक्टरांना दाखवा. डॉक्टर औषध पाहून त्याची खरेपणा सहज ओळखू शकतात. औषधाची बॅच नंबर आणि कालबाह्यता तारीखही तपासा. बनावट औषधांवर ही माहिती अस्पष्ट किंवा चुकीची असू शकते.

खरी आणि बनावट औषधांची ओळख करणं आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. वर सांगितलेल्या पद्धतींचा अवलंब करून तुम्ही बनावट औषधांपासून स्वतःचा बचाव करू शकता.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

पश्चिम रेल्वेवर आज 4 तासांचा जम्बोब्लॉक, कुठे, कधी, वेळ तर जाणून घ्या पश्चिम रेल्वेवर आज 4 तासांचा जम्बोब्लॉक, कुठे, कधी, वेळ तर जाणून घ्या
मुंबईकरांची लाईफलाइन असलेली लोकल अविरत धावत असते. रोजच्या रोज लाखो प्रवाशांचा, चाकरमान्यांचा भार वाहणाऱ्या या रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर वेळोवेळी देखभालीच्या,...
‘पाठ्यपुस्तकात मुघलांवर 8 धडे आणि आपल्यावर फक्त 1…’, आर माधवनने वास्तवावर ठेवलं बोट
Waves Summit ची जगभर चर्चा; दुसर्‍या दिवशी 90 हून अधिक देशांच्या सेलिब्रिटींचा भरला मेळा
WAVES 2025: संगीतापासून चित्रपट निर्मितीपर्यंत… ‘क्रिएट इन इंडिया चॅलेंज’ च्या विजेत्यांची यादी
अजितदादांची घाई, नाराज मेधाताई; इमारतीच्या उद्घाटनावरून महायुतीत ‘नाराजी’ नाट्य
व्हॉट्सअ‍ॅपवरून द्या तिरुपती बालाजी मंदिराचा फीडबॅक
पोलीस आयुक्तालयाच्या बुद्धीचा ‘फिटनेस’ गेला, ध्वजारोहणाच्या परेडसाठी मुदत संपलेली गाडी! RTO चे नियम वाहतूक शाखेने पायदळी तुडवले