वयाच्या 23 व्या वर्षी अभिनेत्री बनली तीन मुलींची आई
लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्री श्रीलीला सध्या एका खास कारणामुळे चर्चेत आली आहे. 23 वर्षीय श्रीलीलाच्या घरात एका चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालं आहे. सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत तिने चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे.
'घरात एक नवीन सदस्य सहभागी झाला आहे. या सदस्याने आमचं हृदय जिंकलंय', असं कॅप्शन देत श्रीलीलाने चिमुकल्या मुलीसोबतचे फोटो पोस्ट केले आहेत. तिने या मुलीला दत्तक घेतलंय की तिच्या कुटुंबाचीच एक सदस्य आहे, हे तिने अद्याप स्पष्ट केलं नाही.
सोशल मीडियावर श्रीलीलाचे हे फोटो पोस्ट होताच त्यावर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. याआधी 2022 मध्ये श्रीलीलाने दोन दिव्यांग मुलांना दत्तक घेतलं होतं. गुरू आणि शोभिता अशी त्यांची नावं आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List