मुंबईतील इलेक्ट्रॉनिक्स शोरूमच्या इमारतीत भीषण आग

मुंबईतील इलेक्ट्रॉनिक्स शोरूमच्या इमारतीत भीषण आग

मुंबईतील वांद्रे परिसरातील एका इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या शोरूमच्या इमारतीत मंगळवारी पहाटे भीषण आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या २५ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अद्याप कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही.

मंगळवारी पहाटे वांद्रे पश्चिम परिसरातील लिंकिंग रोडवरील एका बहुमजली इमारतीत आग लागली. वांद्रे येथे असलेल्या लिंक स्केअर मालला ही आग लागली. बेसमेंटमध्ये ही आग लागली. त्यानंतर ती तिसऱ्या मजल्यापर्यंत पोहचली आहे. आगीमुळे या भागातील रस्ते बंद करण्यात आले आहे.

घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिस पथक आणि अग्निशमन दलाच्या २५ गाड्या आणि इतर अग्निशमन दलाच्या गाड्या आग विझवण्याचे प्रयत्न करत आहेत. रोबोटीक मशीन आणली गेली आहे. ज्या ठिकाणी अग्नीशमन दल पोहचू शकत नाही, त्याठिकाणी रोबोटीक मशीन वापरल्या जात आहेत.

वांद्रे भागातील लिंकिंग परिसरात ही आग लागली. आग सकाळी चार वाजता लागली तेव्हा पोलीस किंवा अग्नीशमन दलाचे अधिकारी आले नसल्याचा आरोप मॉलचे मालक सिद्दीकी  यांनी केला. ते म्हणाले की, सकाळी सहा वाजता आग विझवण्याचे काम सुरु झाले. त्यामुळे आग वाढली. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सिलेंडर होते. त्या सिलेंडरला काही झाले असते तर संपूर्ण लिकींग रोड परिसरात आग पसरली असती, असे सिद्दीकी यांनी ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलताना सांगितले. मोठ्या प्रमाणात धूर परिसरात पोहचला आहे.

गेल्या दोन दिवसांत मुंबईत पहाटे लागलेली ही दुसरी मोठी आग आहे. रविवारी बॅलार्ड इस्टेट परिसरातील अंमलबजावणी संचालनालय (ईडी) कार्यालय असलेल्या इमारतीत भीषण आग लागली होती. त्यात अनेक कागदपत्रे जळाली आहे. परंतु ही सर्व कागदपत्रे डिजिटलाज करण्यात आल्याचा दावा केला जात आहे. दक्षिण मुंबईतील बॅलार्ड इस्टेटमधील कैसर-ए-हिंद इमारतीला पहाटे अडीचच्या सुमारास आग लागली.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;