Pahalgam Terror Attack: हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांना भेटली मॉडेल, म्हणाली, ‘कुरान माहित नव्हतं म्हणून त्यांनी…’

Pahalgam Terror Attack: हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांना भेटली मॉडेल, म्हणाली, ‘कुरान माहित नव्हतं म्हणून त्यांनी…’

Pahalgam Terror Attack: 22 एप्रिल रोजी पहलगाम याठिकाणी झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये 26 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. , दहशतवाद्यांनी काश्मीर फिरण्यासाठी गेलेल्या लोकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे. दरम्यान, मॉडेल एकता तिवारीने एक धक्कादायक खुलासा केला आहे. तिने दावा केला की हल्ल्याच्या अगदी आधी, तिला पहलगाम ट्रिपमध्ये खेचरांच्या वेशात सामील झालेले दोन संशयित दहशतवाद्यांना भेटले होते.

एवढंच नाही तर, एकता हिने गुपचूप व्हिडीओ देखील शूट केला. तिने काही व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर पोस्ट देखील केले आहे. घडलेली घटना सांगत एकता म्हणाली, ‘आम्ही 21 एप्रिल रोजी पहलगामहून परतलो. आता जेव्हा मी सुरक्षा एजन्सींनी जारी केलेले स्केच पाहते तेव्हा मला वाटते की मी मृत्यूपासून थोडक्यात बचावले.’

 

 

एकता तिवारी हिने सांगितल्यानुसार, सुरुवातीला खेचर स्वारीसाठी आम्ही एकासोबत बोलत होते. पण जेव्हा आम्ही त्यांच्याकडे पोहोचलो, तेव्हा ते अमरनाथ यात्रा, धर्म आणि लग्नाबद्दल विचारु लागले. घाबरल्यामुळे मी त्यांना काही खरं सांगू शकली नाही. त्यामधील एक स्वतःला कुरानचा तज्ज्ञ म्हणत होता आणि धर्माबद्दल बोलत होता.

एकताने सांगितले की, खेचर असलेले दोन लोक त्यांना वारंवार बैसरन व्हॅलीमध्ये चालण्यास भाग पाडत होते. जेव्हा त्याचा गट तिथे गेला नाही तेव्हा ते रागावले आणि गैरवर्तन करू लागले. एकता म्हणाली, ‘आमच्या गटातील अर्धे लोक भीतीमुळे आधीच परतले होते’.

 

 

पुढे एकता म्हणाली, ‘त्यांनी मला विचारलं कुरान पठण करते का? त्यानंतर रुद्राक्ष माळा घातल्यामुळे त्यांनी टोमणे मारले.’ एकताने असाही दावा केला की एका माणसाने त्याच्या बुटात कीपॅड फोन लपवला होता, जो तिला खूप संशयास्पद वाटला. घरी परतल्यानंतर, एकताने ताबडतोब सीएम हेल्पलाइन 1076 वर ही बाब कळवली.

‘त्या घटनेचा आता विचार केला की वाटतं की मोठ्या संकटातून बाहेल आलोत. त्यांना सामान्य लोकांमध्ये फिरू देऊ नये. ते निष्पाप पर्यटकांमध्ये लपून काहीही करू शकतात, जसं यावेळी घडलं…’ सध्या मॉडेलची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

जमिनीच्या मोबदल्यासाठी शेतकरी आक्रमक, भर पावसात रेल्वे रुळांवर ठिय्या, अखेर प्रशासनाने उचलले पाऊल जमिनीच्या मोबदल्यासाठी शेतकरी आक्रमक, भर पावसात रेल्वे रुळांवर ठिय्या, अखेर प्रशासनाने उचलले पाऊल
सांगलीमधून मोठी बातमी समोर येत आहे. रेल्वे प्रशासनाकडून संपादित करण्यात आलेल्या जमिनीचा मोबदला मिळाला यासाठी शेतकरी आक्रमक झाले होते. बाधित...
‘मॅक्सवेलने तुझ्याशी लग्न केलं नाही का?’ चाहत्याने असा प्रश्न विचारताच प्रीती झिंटा भडकली अन्….
प्रसन्न आहात ना?…प्रेमानंद महाराजांनी विचारताच अनुष्का झाली भावूक अन् रडू लागली,पाहा व्हिडीओ
राज्यातील 8 वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, रविंद्र शिसवे गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी
Justice BR Gavai : महाराष्ट्राचे भूषण गवई देशाचे 52वे सरन्यायाधीश म्हणून बुधवारी घेणार शपथ
अजित पवार गटाचे आमदार किरण लहामटे यांच्या गाडीचा अपघात, ट्रकने दिली जोरदार धडक
Monsoon 2025 News : आनंदाची बातमी! मान्सून अंदमानमध्ये दाखल, महाराष्ट्रात कधी बरसणार?